Sunday , September 20 2026
Breaking News

नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांची आजही समाजाला नितांत गरज : प्रसाद सावंत

Spread the love

 

बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि प्रगतीशील लेखक संघ, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांची आज गरज” या विषयावर भगतसिंग सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ शिक्षक श्री. प्रसाद सावंत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवलिला मिसाळे या होत्या.
आपल्या व्याख्यानात प्रसाद सावंत यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे कार्य, त्यांची वैज्ञानिक दृष्टिकोनाची भूमिका, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेला संघर्ष आणि संविधानाने अपेक्षित केलेल्या वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रसाराचे महत्त्व यावर सखोल विवेचन केले. समाजात विवेक, चिकित्सक विचार आणि मानवतावादी मूल्ये रुजविण्यासाठी दाभोलकर यांच्या विचारांचे महत्त्व आज अधिक अधोरेखित झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, अंधश्रद्धा, अफवा आणि अवैज्ञानिक समजुतींना बळी न पडता प्रत्येक नागरिकाने तर्कशुद्ध विचार करण्याची सवय जोपासली पाहिजे. शिक्षण, विज्ञान आणि संविधानिक मूल्यांच्या माध्यमातूनच समाज अधिक प्रगत आणि समताधिष्ठित होऊ शकतो. विशेषतः युवकांनी डॉ. दाभोलकर यांच्या विचारांचा अभ्यास करून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोपात शिवलिला मिसाळे यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे कार्य समाजपरिवर्तनासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. विवेकवाद, सामाजिक समता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा प्रसार करण्यासाठी अशा व्याख्यानमालेचे आयोजन सातत्याने व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास आनंद मेणसे, अनिल आजगावकर, सागर मरगाणाचे, इंद्रजीत मोरे, नीला आपटे व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *