निपाणी (वार्ता) : श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ महासंस्थान, कणेरी, अंतर्गत श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी मार्फत येथे २६ व २७ ऑक्टोबर या दोन दिवशी मोफत सेंद्रिय शेतीबाबत मेळाव्याचे आयोजन केले आहे. या सेंद्रिय शेती मेळाव्यासाठी मार्गदर्शक म्हणून सुभाष शर्मा (नैसर्गिक शेती तज्ञ, यवतमाळ), अशोकराव इंगवले (आदर्श खिल्लार गोपालक, …
Read More »निपाणीचा २६ पासून ऊरूस
अध्यक्ष बाळासाहेब सरकार : २७ रोजी मुख्य दिवस निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाणाऱ्या येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब (क.स्व) यांचा उरूस गुरूवार (ता.२६) ते शनिवार (ता.२८) या …
Read More »तब्बल ३५ वर्षानंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा
बेनाडी हायस्कूलमध्ये गुरुवंदना : शिक्षकांच्या खाल्ल्या छड्या निपाणी (वार्ता) : ओळखलंस का मला?… सॉरी नाही ओळखलो!..अरे मी…अरे बापरे!, कसा ओळखणार? तू किती बदलायस! अरे तुला भेटून किती बरं वाटलं म्हणून सांगू…’ आणि मग कडकडून मिठी मारण्याचा प्रसंग बेनाडी येथील श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल मध्ये घडला. निमित्त होते, गुरुवंदना मित्रोत्सव कार्यक्रमाचे! …
Read More »शिरगुप्पीत शेतामधील चंदनाच्या झाडाची चोरी
निपाणी (वार्ता) : सयाजीराव गणपतराव देसाई यांच्या शेतामध्ये २५ वर्षापूर्वी लावलेल्या चंदनाच्या झाडाची शिरगुप्पी (ता. निपाणी) येथे चोरी केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सदर शेतकऱ्याने निपाणी शहर पोलिसात फिर्याद नोंदवली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सयाजीराव यांच्या सर्वे क्रमांक 141/1 मधील शेतात 25 वर्षे जुने चंदनाचे झाड होते. …
Read More »पुलाचे बांधकाम न थांबविल्यास तीव्र आंदोलन
कुर्ली परिसराला पुराचा धोका : तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर यमगर्णी जवळील वेदगंगा नदीवर पूल मंगुर फाट्यावर नवीन उड्डाण पूल बांधण्यात येत आहे. पुलासह दोन्ही बाजूला कच्चा मुरूम टाकला जात आहे. येथे पूल बांधल्यास पावसाळ्यात कुर्लीसह परिसरातील गावांना …
Read More »कर्णबधीर, मतिमंद मुलांसोबत साजरा केला मुलींचा वाढदिवस; स्नेहभोजनाचीही मेजवानी
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील संगीता शिवानंद चिक्कमठ त्यांच्या दोन्ही मुली अंकिता व अर्पिता यांचा वाढदिवस कर्णबधीर मुलांसोबत साजरा करत त्यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करून एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. निपाणीतील सावंत कॉलनीतील नितीनकुमार कदम कर्णबधीर विद्यालय येथे हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक नामदेव चौगुले हे होते. …
Read More »महाराष्ट्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बस पास; पालकमंत्री जारकीहोळींचे प्रयत्न
निपाणी (वार्ता) : गेल्या काही महिन्यापासून निपाणी ते कोल्हापूरसह कर्नाटक राज्य सीमेलगत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व गावात डिग्री व डिप्लोमा शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे बस पास देणे निपाणी आगाराने बंद केले होते. हे बस पास सुरू करण्याची मागणी ह्युमन राईट्स केअर आँरगेनायझेशनने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन पालकमंत्री …
Read More »छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण रथ यात्रेची बुधवारी निपाणीत मिरवणूक
निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्या भिषेक सोहळा वर्ष व विश्व हिंदू परिषदेची षष्ठीपुर्ती वर्षानिमित्त बजरंग दलातर्फे छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण रथ यात्रेचे नियोजन करण्यात येणार आहे. या यात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासना रूढ भव्य मिरवणूक बुधवारी (ता.११) दुपारी ४ वाजता बस स्थानकाजवळील मानवी …
Read More »निपाणी महादेव मंदिरमधील शिबिरात १०१ जणांचे रक्तदान
निपाणी (वार्ता) : खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची रविवारी एकसष्टी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त येथील महादेव मंदिरात श्री गणेश मंडळ व हेल्थ क्लब यांच्यातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून १०१ जणांनी रक्तदान केले. याशिवाय प्रभाग क्रमांक ६, ७, ८ आणि १४ मध्ये डास प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात आली. हॅलो …
Read More »बोरगाव येथील विहिरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
निपाणी (वार्ता) : विहिरीचे पाणी पिण्यासाठी आले असता बोरगाव येथील सोबणे शेतातील विहिरीत पडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या व्यक्तीचे वय ५० ते ५५ असून त्याच्या अंगावर हिरवा शर्ट आणि चॉकलेटी रंगाची पॅन्ट आहे. सदलगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta