Friday , November 6 2026
Breaking News

कुर्लीत रविवारी ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन

Spread the love

 

संमेलनाध्यक्ष पदी डॉ. सुभाष आठल्ये

निपाणी (वार्ता) : कुर्ली (ता.निपाणी) येथील एच जे सी सी फौंडेशन पुरस्कृत ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीतर्फे ९ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन रविवारी (ता.१७) आयोजित करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील ज्येष्ठ पर्यावरण डॉ. सुभाष आठल्ये हे या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात निकोप समाज निर्मितीसाठी विज्ञान जागृती करण्याच्या हेतूने या संमेलनात विविध वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणारे उपक्रम आयोजित केले जातात. या वर्षी पर्यावरण जागृकता, प्रायोगिक विज्ञान व प्रात्यक्षिक कौशल्य, ‘आम्ही असे घडलो’ प्रकट मुलाखत, अंधश्रद्धा निर्मूलन प्रयोगिक कार्यक्रम, उमंग सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी व विज्ञान प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य सैनिक मारुती माने यांचे स्मरणार्थ शनिवारी (ता.१६) विज्ञान आकृती रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी अनुक्रमे १०००, ७००, ५०० रुपये व उतेजनार्थ पारितोषिक ठेवण्यात आल्याची अशी माहिती संमेलन समितीचे संचालक कुमार माळी यांनी दिली. याप्रसंगी एस. एस. चौगुले, ए. ए. चौगुले, टी एम यादव, डी. एस. शेवाळे, एस. एम. नदाफ, एस. के. पोटले, एस. व्ही. यादव, अमोल आवटे, आनंदा ढगे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जेलभरो आंदोलनासाठी जाणाऱ्या ‘रयत’च्या कार्यकर्त्यांना निपाणी पोलिसांनी रोखले

Spread the love    निपाणी (वार्ता) : यंदा सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने ऊसासह अन्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *