Sunday , July 26 2026
Breaking News

कुन्नूर कृषी पत्तीन संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा बोरगावमध्ये सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : कुन्नूर येथील श्री दूधगंगा विविधउद्देशगळ प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या नवनिर्वाचित संचालकांचा बोरगाव येथे सत्कार झाला. नूतन पदाधिकाऱ्यांनी बोरगांव येथे सहकाररत्न रावसाहेब पाटील व सहकाररत्न उत्तम पाटील यांची भेट घेतली. त्याप्रसंगी त्यांचा सत्कार केला.
सहकारत्न उत्तम पाटील यांनी, सर्वांच्या सहकार्याने या संघावर आपल्या गटाचे वर्चस्व निर्माण झाले आहे. या पुढील काळातही शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपण शासकीय योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यावेळी संचालक अनिल सकान, चैतन्य चेंडके, रामचंद्र जाधव, लक्ष्मण कांबळे, शिवचंद्र तावदारे, विजय नाईक, अजित कोणे, उमा राजेंद्र पाटील, जयश्री अरुण निकम, मीनाक्षी राजेंद्र तावदारे, पल्लवी बुरुड, पंडित हेगडे, ग्राम पंचायत अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, सदस्य शिवाजी निकम, धोंडीराम धनगर, मानाजी चेंडके, पोपट जाधव, संतोष कोळी, राजू कोळी, प्रसाद मगदूम, अनिल निकम, माणिक कांबळे, वैभव चेंडके यांच्यासह संचालक व सभासद उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *