संकेश्वर (महंमद मोमीन) : राजस्थानी लोक नोकरीपेक्षा मालक होणे पसंद करतात असे कणेरी मठाचे अदृश्य श्री काडसिध्देश्वर महास्वामीजींनी सांगितले. शिडल्याळी व्यापारी संकुलात नव्याने प्रारंभ करण्यात आलेल्या जसलोक स्वीट दुकानाचे उद्घाटन करुन श्रींनी आपले मनोगत व्यक्त केले. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी, कणेरी मठाचे …
Read More »पालिकेच्या बाजार करात गोलमाल..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेतर्फे माहे मे महिन्यात बाजार कर फक्त ३८०० रुपये वसूल झाल्याचा मुद्दा नगरसेवक गंगाराम भूसगोळ यांनी उचलून धरला. तब्बल चार महिन्यांनंतर आज पालिकेची मासिक सभा घेण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांनी भूषविले होते. नगरसेवक जितेंद्र मरडी यांनी पालिकेने बाजार करात गोलमाल …
Read More »संकेश्वरातील श्रीराम मंदिराला खासदारांकडून ५ लाख रुपयांचा निधी मंजूर
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर हौसिंग काॅलनीत श्रीराम मंदिर निर्माणचे काम केले जात आहे. चिकोडी लोकसभा मतक्षेत्राचे खासदार अण्णासाहेब ज्वोल्ले यांनी धर्मादाय खात्यातून पाच लाख रुपयांचा निधी हौसिंग काॅलनीतील श्रीराम मंदिर जिर्णोद्धार कामासाठी मंजूर केला आहे. मंजुरी पत्राचे हस्तांतरण खासदार अण्णासाहेब ज्वोल्ले यांचे आप्तसचिव संतोष सिंगने यांनी आज श्रीराम मंदिर …
Read More »रोहिणी पेरा, मोत्यांचा तुरा.. गेले ते दिवस…
संकेश्वर (महंमद मोमीन) : रोहिणी पेरा, मोत्याचा तुरा… सांगण्याचे दिवस मागे पडल्याने शेतकरी निसर्गाच्या बदलाचा स्विकार करीत खरीप आणि रब्बी पिके घेतांना दिसत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांना रोहिणी नक्षत्र काळात खरीपाची पेरणी करण्याचे भाग्य लाभलेले नाही. यंदा तर शेतकऱ्यांना खरीपाची पेरणी आद्रा नक्षत्र काळात करावी लागली आहे. रोहिणी …
Read More »संकेश्वर पालिका डासांचा नायनाट करण्यासाठी पुढे सरसावली!
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिका डेंग्यू मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावात फाॅगिंग मशीनने औषध फवारणीचे कार्य करताना दिसत आहे. आज प्रभाग क्रमांक ५ मधून फाॅंगिंग कार्याचा शुभारंभ करण्यात आला. पावसाळ्यात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. परिणामी डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सारखे आजार बळावतात. हे आजार टाळण्यासाठी संकेश्वर पालिका डासांचा …
Read More »संकेश्वर येथे 18 लाखाची दारू जप्त अबकारी खात्याची कारवाई
संकेश्वर : गोवा राज्यातून बेकायदेशीर मध्याची वाहतूक करणार्या वाहनाची तपासणी करून 280 बॉक्स असे अठरा लाखाची दारू अबकारी विभागाने धाड घालून जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत वाहन चालक बसवराज वीरभद्र दिंडलकुट्टी (वय 36) रा. खनगाव असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. अबकारी विभागाला मिळालेल्या माहितीनुसार …
Read More »अंकले विहिरीचे पाणी कुरणं गोशाळेला..
संकेश्वर (महंमद मोमीन) : अंकले ग्रामपंचायत विहिरीचे पाणी कुरणं गोशाळेला देण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आल्याची माहिती अंकले ग्रामपंचायतचे अध्यक्ष एकनाथ पोवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. ते पुढे म्हणाले, निडसोसी मठातर्फे कुरणं येथील गो-शाळा चालविली जाते. गोशाळेतील गायींना शुध्द पिण्याचे पाणी अंकले ग्रामपंचायतच्या विहिरीतून मिळवून देण्याची मागणी मठातर्फे …
Read More »ए. बी. पाटील यांचं उत्तर….?
संकेश्वर (महंमद मोमीन) : माजी मंत्री ए. बी. पाटील हे आगामी विधानसभा निवडणूक बेळगांव उत्तर मतक्षेत्रातून लढविणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगलेली दिसत आहे. याविषयी अद्याप तरी ए. बी. पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ए. बी. यांचं उत्तर? काय असणार यांचे औत्सुक्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेले दिसत आहे. …
Read More »संकेश्वरात रस्त्यांची वाट लागलीयं….!
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील बरेच रस्ते पावसाच्या पाण्याने उखडलेले दिसताहेत. बऱ्याच रस्त्यांची चाळण झाल्याने दुचाकी चारचाकी तसेच ॲटोरिक्षा चालकांची चांगलीच गैरसोय होतांना दिसत आहे. खड्डेमय रस्त्यांत पावसाचे पाणी साचून रस्त्याला ओढ्याचे स्वरुप प्राप्त झालेले दिसत आहे. येथील प्रभाग क्रमांक ४ मधील अंबिका नगरला जाणारा रस्ता चांगलाच गैरसोयीचा बनलेला …
Read More »बसवेश्वरांचे वचन साहित्य समाजाला दिशा देणारे : प्रा. व्ही. बी. पाटील
संकेश्वर (महंमद मोमीन) : विश्वगुरु श्री बसवेश्वरांचे वचन साहित्य समाजाला दिशा देणारे असल्याचे मजलट्टी सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक व्ही. बी. पाटील यांनी सांगितले. ते संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर सभामंडप येथे गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित एकदिवसीय विशेष व्याख्यान कार्यक्रमात वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला दिव्य सानिध्य बैलूरचे परमपूज्य श्री बसव चेतन देवरु …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta