Sunday , July 26 2026
Breaking News

संकेश्वर पालिका डासांचा नायनाट करण्यासाठी पुढे सरसावली!

Spread the love

 

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिका डेंग्यू मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावात फाॅगिंग मशीनने औषध फवारणीचे कार्य करताना दिसत आहे. आज प्रभाग क्रमांक ५ मधून फाॅंगिंग कार्याचा शुभारंभ करण्यात आला. पावसाळ्यात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. परिणामी डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सारखे आजार बळावतात. हे आजार टाळण्यासाठी संकेश्वर पालिका डासांचा नायनाट करण्यासाठी पुढे सरसावलेली दिसत आहे. पालिकेचे मुख्याधिकारी आर. सी. चौगुला यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व २३ प्रभागात डासांचा नायनाट करण्यासाठी फाॅंगिंग मशीनने औषध फवारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. संकेश्वरातील नागरिकांनी यापूर्वीच पालिकेकडे गावात औषध फवारणी करण्याची मागणी केली होती. पालिकेने त्याची दखल उशीरा का होईना घेतलेली दिसत आहे. नवीन वसाहत (एक्स्टेन्शन) भागात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झालेला असून तेथेच डासांचा प्रादुर्भाव अधिक आहे. याकरिता फाॅंगिंग मशीनने औषध फवारणीचे काम एक्स्टेन्शन एरियात प्रथम हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांतून सांगितले जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *