Sunday , September 20 2026
Breaking News

संकेश्वरातील श्रीराम मंदिराला खासदारांकडून ५ लाख रुपयांचा निधी मंजूर

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर हौसिंग काॅलनीत श्रीराम मंदिर निर्माणचे काम केले जात आहे. चिकोडी लोकसभा मतक्षेत्राचे खासदार अण्णासाहेब ज्वोल्ले यांनी धर्मादाय खात्यातून पाच लाख रुपयांचा निधी हौसिंग काॅलनीतील श्रीराम मंदिर जिर्णोद्धार कामासाठी मंजूर केला आहे. मंजुरी पत्राचे हस्तांतरण खासदार अण्णासाहेब ज्वोल्ले यांचे आप्तसचिव संतोष सिंगने यांनी आज श्रीराम मंदिर जिर्णोद्धार कमिटीला केले. यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, नगरसेवक विवेक क्वळी, रोहण नेसरी, किर्तीकुमार संघवी, संदिप गंजी, महेश सुगते, आणप्पा संगाई, श्रीराम मंदिर जिर्णोद्धार कमिटीचे कुमार संसुध्दी, काडप्पा कमते, किरण भावीदंडी, अनिल संसुध्दी, जितेंद्र भोपळे उपस्थित होते.

हौसिंग काॅलनी श्रीराम मंदिर जिर्णोद्धार कमिटीचे विवेक क्वळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, हौसिंग काॅलनीत श्रीराम मंदिर निर्माणचे काम लोकवर्गणीतून केले जात आहे. चिकोडीचे खासदार अण्णासाहेब ज्वोल्ले यानी मंदिर जिर्णोद्धार कामासाठी पाच लाख रुपये धर्मादाय खात्यातून मंजूर केले आहेत. आम्ही श्रीराम मंदिर जिर्णोद्धार कमिटीच्या वतीने खासदारांंचे विशेष आभार व्यक्त केले असल्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *