चोरांकडून २ लाख किंमतीच्या सहा मोटारसायकली जप्त संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी हे संकेश्वरातील जुना पी. बी. रोड येथील युपी धाब्याजवळ वाहन तपासणीचे कार्य करताना तीन मोटारसायकल चोर सापडले आहेत. बेळगांव निपाणी येथील सहा मोटारसायकली चोरी केल्याची कबूली चोरांनी केली आहे. याविषयीची पोलीस सूत्रांकडून …
Read More »झाडे जगविण्याचे कार्य करायला हवे : प्राचार्या प्रियांका गडकरी
संकेश्वर (महंमद मोमीन) : झाडे लावा, झाडे जगवा हे फक्त सांगणे नको. प्रत्यक्षात झाडे लावून ते जगविण्याचे कार्य करायला हवे असल्याचे प्राचार्या सौ. प्रियांका प्रशांत गडकरी यांनी सांगितले. येथील श्री दानम्मादेवी शिक्षण संस्था संचलित मदर्स टच किंडर गार्टन शाळेच्या वनमहोत्सव त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वनमहोत्सव कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे …
Read More »हिरण्यकेशीत मासेमारीला उधाण..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर हिरण्यकेशी नदीला पावसाचे नवीन पाणी आल्यामुळे मासेमारीला उधाण आलेले चित्र पहावयास मिळाले. हिरण्यकेशी नदीला आलेले नवीन पाणी पहाण्यासाठी लोकांनी एकीकडे गर्दी केलेली असताना युवकांनी मासेमारी करण्यासाठी गर्दी केलेली दिसली. नदीतील नवीन पाण्यातून गळाला मोठे मासे लागत असल्याच्या चर्चेतून नदी काठावर मासेमारीसाठी युवकांची मोठी गर्दी झालेली …
Read More »संकेश्वर येथील मारुती गल्लीत “झुडपे उगवली” राव…
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १७ मधील मारुती गल्लीतील मातीचे ढिगारं हटविण्याचे काम पालिकेने गेल्या तीन महिन्यांपासून केलेले नसल्यामुळे मातीच्या ढिगाऱ्यात आता झुडपे उगवलेली दिसताहेत. पालिकेचे एक काम बारा महिने थांब सारखा प्रकार चालल्याची तक्रार येथील लोकांनी केली आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना येथील नागरिक रवि कंबळकर म्हणाले, मारुती …
Read More »श्रीक्षेत्र वल्लभगड येथून पायी दिंडीचे प्रस्थान
संकेश्वर (महंमद मोमीन) : श्रीक्षेत्र वल्लभगड येथून आज विठूरायाच्या नाम गजरात, टाळ मृदंगाच्या निनादात भक्तीमय वातावरणात श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी वारी पायी दिंडीचे प्रस्थान झाले. वल्लभगड श्रीराम मंदिर येथे दिंडी चालक हभप हैबती वाघमोडे यांनी विणापूजन करुन दिंडी सोहळ्याला चालना दिली. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे झाली वल्लभगड पायी दिंडी सोहळा …
Read More »संकेश्वरातून विठूरायाच्या नाम गजरात पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातून आज विठूरायाच्या नाम गजरात, टाळ मृदंगाच्या निनादात श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडीचे भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले. श्री शंकराचार्य संस्थान मठ येथून पायी दिंडी सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. संकेश्वरात कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे झाली पंढरपूर पायी वारीचे भाग्य वारकरींना लाभले नव्हते. यंदा मात्र विठ्ठलाच्या कृपेने वारकरींना …
Read More »सीएम पुष्पहार तुम्हाला अन फेटा मला….!
संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरीचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं नेहमीच या- ना त्या कारणाने कायम चर्चेत राहिलेले दिसत आहेत. मंत्री उमेश कत्ती कोणत्या प्रसंगी काय बोलतील आणि काय करतील हे सांगता यायचे नाही. त्यामुळे प्रसार माध्यमांंत ते कायम चर्चेत राहिलेले दिसत आहेत. बेंगळूर येथे …
Read More »संकेश्वरात शुध्द पिण्याचे पाणी गटारीला..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर कुंभार गल्लीतील जलवाहिनी फुटल्याने शुध्द पिण्याचे पाणी गटारीतून वाहताना दिसत आहे.पालिकेचे अधिकारी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी इकडे लक्ष द्यायला तयार नसल्याची तक्रार येथील येथील नागरिकांनी महिलांनी केली आहे. येथील लोकांनी जलवाहिनी दुरुस्तीची मागणी केलेली असली तरी कोणीही याची दखल घ्यायला तयार नसल्याने लोकांतून संताप व्यक्त केला …
Read More »संकेश्वरात चर्चेतील लिंगायत रुद्रभूमी..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील लिंगायत रुद्रभूमिचा विचार समाजाचे नेते मंडळी कधी करणार? असा प्रश्न समाज बांधवांतून विचारला जात आहे. कारण लिंगायत रुद्रभूमिला जाण्याकरिता निटसा रस्ता नाही, आणि पावसाळ्यात रुद्रभूमित दफनविधी करता येत नाही. अशी अवस्था आहे. पावसाळ्यात हिरण्यकेशी नदीचे पाणी रुद्रभूमित शिरकाव करीत असल्याने वीरशैव लिंगायत समाज बांधवांना मयत …
Read More »संकेश्वरातून उद्या पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान होणार
संकेश्वर (महंमद मोमीन) : कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे झाली पंढरपूर पायी वारीचे भाग्य संकेश्वरातील वारकरींना लाभले नव्हते. यंदा संकेश्वर परिसरातील वारकरींना पायी वारीचा योग पांडुरंगाच्या कृपेने मिळाला आहे. संकेश्वर येथे श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी पायी दिंडी सुरू होऊन ४५ वर्षे झाली. उद्या मंगळवार दि. २८ जून २०२२ रोजी सकाळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta