बेंगळुरू : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप राज्यात जेडीएस सोबत युती करत असल्याच्या चर्चेला माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पडदा टाकला. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी पुष्टी केली की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या निर्णयाला आधीच ग्रीन सिग्नल दिला आहे. मात्र किती जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. …
Read More »शनिवारी निपाणीत वीज, पाणीपुरवठा खंडित
बेनाडी, जत्रांटमध्येही वीज बंद : दिवसभर दुरुस्तीची कामे निपाणी (वार्ता) : हेस्कॉमकडून शनिवारी (ता.९) दिवसभर येथील चिक्कोडी रोडवरील विद्युत केंद्र आणि बेनाडी, जत्राट येथील विद्युत केंद्रामध्ये दुरुस्तीचे काम चालणार आहे. त्यामुळे दिवसभर वीजपुरवठा खंडित होणार आहे. शहराला पाणी पुरवणाऱ्या जवाहर तलावावर आणि यमगर्णी जॅकवेल परिसरातही वीज खंडित केली जाणार …
Read More »बलिदानातून उभारलेला भारत वाचवण्यासाठी दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची गरज
मुख्यमंत्री सिद्धरामय्या; समाजात फूट पाडण्याचे काम होत असल्याचा आरोप बंगळूर : प्रशासनाचे अपयश झाकण्यासाठी लोकांमध्ये परस्पर द्वेषाची पेरणी करून जाती-धर्माच्या आधारे समाजात फूट पाडण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपले जाते. याविरुद्ध एकत्रित लढा उभारण्याची गरज आहे. बलिदानातून उभारलेला भारत वाचवण्यासाठी दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याची …
Read More »गृहलक्ष्मी योजनेची नोंदणी स्थगित नाही : लक्ष्मी हेब्बाळकर
नोंदणी स्थगितच्या पोस्टने गोंधळ बंगळूर : गृहलक्ष्मी योजनेची नवीन नोंदणी थांबलेली नाही, असे महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. विभागाच्या वेबसाइटवर केलेल्या घोषणेची आपल्याला माहिती नसल्याचे त्या म्हणाल्या. महिला व बालकल्याण विभागाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे की गृहलक्ष्मी योजनेसाठी नोंदणीकृत लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन …
Read More »खानापूर हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे 29 ऑक्टोबर रोजी आयोजन
बेळगाव : खानापूर हाफ मॅरेथॉन 2023 स्पर्धा 29 ऑक्टोबर 2023 रोजी मलप्रभा मैदान, खानापूर येथे होणार आहे. तिसऱ्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा एकूण चार गटात होणार असून त्यामध्ये हाफ मॅरेथॉन (21.097 किमी), 10 किमी, 5 किमी आणि 3 किमीची फन रन असणार आहे. या स्पर्धेतील …
Read More »निपाणी ते बोरगाव- इचलकरंजी रस्त्याची दयनीय अवस्था!
निपाणी : निपाणी ते बोरगाव इचलकरंजी नव्याने केलेला रस्ता पहिल्या पावसाळ्यातच वाहून गेल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यावरती खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. ममदापूर बस स्टॅन्डजवळ भर रस्त्यात मोठा खड्डा पडल्यामुळे त्या ठिकाणी मधोमध सिमेंटचा बॅरल लावलेला …
Read More »जिल्हाधिकाऱ्यांनी दिली निपाणीला धावती भेट
रस्ता कामांची पाहणी; नागरिकांच्या समस्या तशाच निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिका पदाधिकाऱ्यांची मदत संपल्याने या पालिकेचा पदभार जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे आहे. पण या शहराकडे ते बऱ्याच महिन्यापासून आलेले नव्हते. मात्र बुधवारी (ता.६) सायंकाळी शहर आणि उपनगरांना भेट दिली. यावेळी त्यांनी नगरोत्थान योजनेच्या चौथ्या टप्प्यात मंजूर झालेल्या निधीतून सुरू …
Read More »निपाणी हालसिद्धनाथची निवडणूक होणार बिनविरोध
शेवटच्या दिवशी जोल्ले समर्थकांचे ५ अर्ज; विरोधी गटाकडून एकही अर्ज नाही निपाणी (वार्ता) : येथील श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांना मानणाऱ्या ५ जणांनी अर्ज दाखल केल्याने अर्जांची संख्या ३९ झाली आहे. पण विरोधी …
Read More »गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बीला परवानगी नाही
मंडल पोलीस निरीक्षक तळवार : गणेशोत्सवाबाबत शांतता बैठक निपाणी (वार्ता) : गणेशोत्सव सर्वांना शांततेत साजरा करावयाचा असून सर्व मंडळानी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. गणेश विसर्जन मिरवणूकीत डॉल्बी वापरण्यावर प्रशासनाने बंदी घातली आहे. इतर किरकोळ आवाजाच्या साधना बाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. यंदा पर्जन्यमान कमी असल्याने …
Read More »निपाणीत शनिवारी ढोल ताशांच्या निनादात लाखाची दहीहंडी
निपाणी (वार्ता) : तब्बल ३७ व्या वर्षात पदार्पण केलेल्या चाटे मार्केट व्यापारी दहिहंडी मित्र मंडळच्या वतीने शनिवारी (ता.९) सायंकाळी ६ वाजता मानाची दहीहंडी फोडली जाणार आहे. विजेत्या गोविंदा पथकास एक लाखांचे बक्षीस व शिल्ड दिली जाणार असल्याचे चाटे मार्केट व्यापारी दहीहंडी मित्र मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दहीहंडी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta