खानापूर : खानापूर शहरातील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या चेअरमनपदी पुन्हा माजी चेअरमन व माजी जिल्हा पंचायत सदस्य नारायण कार्वेकर (मोदेकोप) यांची तर व्हाईस चेअरमनपदी परशराम ठोंबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित चेअरमन गेल्या पंधरा वर्षे पासुन चेअरमनपदाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा चेअरमनपदाची संधी देण्याचा …
Read More »खानापूर वकील संघटनेच्या वतीने आमदार विठ्ठल हलगेकर यांचा सत्कार
खानापूर : खानापूर तालुका वकील संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा सत्कार सोहळा सोमवारी दि. ३१ रोजी खानापूर कोर्टातील वकील संघटनेच्या कार्यालयात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वकिल संघटनेचे अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी होते. व्यासपीठावर ऍड. एच. एन देसाई, ऍड. केशव कळेकर, ऍड. सुरेश भोसले, ऍड. अनंत देसाई, ऍड. …
Read More »धबधब्याजवळ अधिकाऱ्यांची ओली पार्टी : उर्वरित चार कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
बेळगाव : बटावडे धबधब्याजवळील जंगल परिसरात दारूबंदीचे उल्लंघन करून मौजमजा केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध यापूर्वीच तक्रार दाखल करण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांनी अन्य चौघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यटनास बंदी असतानाही बटावडे धबधब्याजवळील वनपरिक्षेत्रात अधिकारी व डॉक्टरांच्या गटाने ओली पार्टी केल्याप्रकरणी जांबोटी वनपरिक्षेत्रात चार जणांविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात …
Read More »पर्यटनास निर्बंध असताना अधिकाऱ्यांनीच केली धबधब्याजवळ ओली पार्टी!
बेळगाव : अतिवृष्टीमुळे धबधब्याजवळ जाण्यास पर्यटकांना निर्बंध घालण्यात आले असताना अधिकाऱ्यांनीच ओली पार्टी केल्याची घटना जांबोटीजवळच्या बटावडे धबधब्यावर घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, हेस्कॉमचे कांही अधिकारी आणि डॉक्टरांच्या एका गटाने जांबोटीजवळील बटावडे धबधब्याजवळ तंबू ठोकून मोठ्या प्रमाणात पार्टी करून मौजमजा केल्याची घटना सर्वत्र चर्चेत आहे. पावसामुळे धबधबा आणि …
Read More »मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह 19 नेत्यांना हायकमांडकडून बोलाओ
बंगळुरू : काँग्रेस आमदारांमधील असंतोषाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने हस्तक्षेप केला आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांना दिल्लीत उपस्थित राहण्याचे आदेश जारी केला आहे. हायकमांडने काँग्रेसच्या १९ नेत्यांना दिल्लीत येण्याची सूचना केली असून या पार्श्वभूमीवर सतीश जारकीहोळी, रामलिंगरेड्डी यांच्यासह अनेक मंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, …
Read More »विस्तारित कार्यकारिणीमध्ये तरुणांना समाविष्ट करून संघटना बळकट करण्याचा निर्धार!
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शिवस्मारक येथे दिनांक 30 जुलै रोजी म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सद्यस्थितीत महाराष्ट्र एकीकरण समिती समोर अनेक आव्हाने आहेत. संघटना बळकट करण्यासाठी नवनिर्वाचित अध्यक्ष व समिती पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागणे …
Read More »डी. के. शिवकुमार यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
नवी दिल्ली : उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती मिळवल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना सर्वोच्च न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयने डी. के. शिवकुमार यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली आणि म्हटले की, ते उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे सीबीआय मागे हटली आहे. उच्च न्यायालयाने …
Read More »राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; हवामान खात्याचा अंदाज
बंगळुरू : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी असून हवामान सूर्यप्रकाशित आहे. दरम्यान, 3 ऑगस्टनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 3 ऑगस्टनंतर किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कन्नड, उडुपी, उत्तर कन्नड जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बेळगाव, बिदर, गदग, हावेरी, धारवाड, …
Read More »नदीकाठावरील पीके अद्याप पाण्याखाली
कोगनोळी परिसरातील चित्र : पावसाची उघडीप कोगनोळी : कोगनोळी सह परिसरात गेल्या दहा-बारा दिवसापासून संततधार पाऊस सुरु होता. त्यामुळे जनजीवन विस्कळित होऊन बसले होते. कधी एकदा पाऊस उघडतो याची चिंता शेतकरी वर्गासह नागरिकांना लागून राहिली होती. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. धुवाधार पावसामुळे दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले …
Read More »मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे दलितांचे खरे रक्षक : राजेंद्र पवार- वडर यांची माहिती
निपाणी (वार्ता) : दलित समुदायासाठी आर्थिक व सामाजिक विकासासाठी राज्यातील काँग्रेस सरकार कार्यतत्पर आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे तर दिन दलितांचे नेहमीच विचार करीत असतात. त्यांच्या विकाकासाठी कार्यरत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून दलितांच्यासाठी असलेल्या निधीवर इतर लोकांनी डल्ला मारत होते. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नियमात दुरुस्ती करून दलितांचे निधी दलितांच्यासाठीच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta