Friday , December 19 2025
Breaking News

कर्नाटक

इच्छुकांचे अर्ज समितीकडे दाखल!

  बेळगाव : गेल्या दोन निवडणुकीत पराभवाचा सामना करत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीने आगामी विधानसभा निवडणुकीत योग्य रणनीती ठरवून मराठी भाषिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार घेतला आहे. आतापर्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून निवडणुकीच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल उमेदवार निवडीच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. बेळगाव दक्षिण, बेळगाव …

Read More »

गुलबर्ग्यात दहावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपीचा प्रकार; अधिकाऱ्यांसह १६ शिक्षक सेवेतून निलंबित

  बंगळूर : सोमवारी दहावी (एसएसएलसी) परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी करण्यास परवानगी दिल्याबद्दल गुलबर्गा जिल्ह्यातील अफझलपूर तालुक्यातील गोब्बूर सरकारी शाळेतील मुख्याध्यापक आणि १६ सहाय्यक शिक्षकांना सार्वजनिक शिक्षणाच्या अतिरिक्त आयुक्तांनी निलंबित केले आहे. निलंबनाच्या आदेशात, सार्वजनिक शिक्षण विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद प्रकाश मीणा यांनी म्हटले आहे की, ड्युटीवर असलेले परीक्षा कर्मचारी, पर्यवेक्षक …

Read More »

कार्यकर्तेच मला विजयी करतील : काकासाहेब पाटील

निपाणी (वार्ता) : सध्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपली प्रकृती साथ देईल की नाही या संभ्रमावस्थेमुळे आपण उमेदवारी नाकारली होती. काँग्रेसचे नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ही निवडणूक लढवणार आहोत. त्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला उमेदवारी जाहीर केली असून आता ही निवडणूक कार्यकर्त्यांची …

Read More »

आबासाहेब दळवींचा अर्ज खानापूर समितीकडे दाखल

  खानापूर : विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणारे आबासाहेब दळवी यांनी आज खानापूर विभाग समिती निवड समितीकडे आपला विनंती अर्ज सादर केला आहे. यावेळी शिवाजी पाटील (मणतुर्गे), अरुण देसाई (नेरसे), ईश्वर बोबाटे (मणतुर्गे), बाळासाहेब शेलार (मणतुर्गे), राजाराम देसाई (हलशीवाडी), खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, …

Read More »

काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, अनेक नेत्यांना धक्का; विनय कुलकर्णी, काकासाहेब पाटील यांना लॉटरी

  बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. या दुसऱ्या यादीमुळे बेळगाव जिल्ह्यातील अनेक काँग्रेस नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या यादीत धारवाडमधून माजी मंत्री विनय कुलकर्णी, निपाणीतून माजी आमदार काकासाहेब पाटील, गोकाकमधून भाजपचे राज्यसभा सदस्य खा. इरण्णा कडाडी यांचे दूरचे नातेवाईक डॉ. महांतेश …

Read More »

कोगनोळी टोलवर १ कोटी ५० लाख जप्त

पोलिसांची कारवाई : एक ताब्यात कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यामध्ये १ कोटी ५० लाख रुपये सापडल्याची घटना बुधवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. अशोक गंगाधरशेठ या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, …

Read More »

सीमा नाक्यावर २ हजार वाहनांची तपासणी

विधानसभा निवडणुक : बंदोबस्त कडक कोगनोळी : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त कडक केला आहे. महाराष्ट्र व इतर राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची या ठिकाणी कसून चौकशी करून व तपासणी करूनच त्यांना कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये या ठिकाणी रोख रक्कम व …

Read More »

ऍड. गणेश गोंधळी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करा : प. पू प्राणलिंग स्वामीजी

  निपपाणी : विश्व हिंदू परिषद व बजरंग दल आणि निपाणी येथील हिंदुत्ववादी संघटनेकडून तहसिलदर प्रविण कारंडे यांना निवेदन देण्यात आले. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाअध्यक्ष प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी यावेळी म्हणाले की, ऍड. गणेश गोंधळी यांच्यावर जो हुबळी येथे अज्ञान समाज‌कंटकानी जो भ्याड हल्ला केला आहे त्याचा आम्ही विश्व हिंदू …

Read More »

भाजपाची पहिली यादी 8 एप्रिलला जाहीर होणार

  बेंगळूरु : राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात भाजप पिछाडीवर असून येत्या शनिवारी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल, या या यादीत अनेक जागांवर नवे चेहरे दिसतील, शिवाय निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड लोकशाही पद्धतीने होत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. भाजपच्या राज्य निवड समितीच्या बैठकीपूर्वी …

Read More »

मंड्या येथे शिवकुमारविरुध्द एफआयआर

  बंगळूर : मंड्यामध्ये नुकत्याच झालेल्या प्रजाध्वनी यात्रेदरम्यान कलाकारांवर पैसे फेकल्याप्रकरणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. २८ मार्च रोजी मंड्यातील बेविनहळ्ळी येथे बसमधून प्रजाध्वानी यात्रेला जात असताना शिवकुमार यांनी कलाकारावर ५०० रुपयांच्या नोटा फेकल्या. याबाबत रिटर्निंग ऑफिसरने जेएमएफसी कोर्टात तक्रार दाखल केली. …

Read More »