Friday , December 19 2025
Breaking News

कर्नाटक

विद्युत झोतातील “अरिहंत चषक” क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन

मान्यवरांची उपस्थिती : चार लाखाची बक्षीसे निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समुहाच्या सहकार्याने निपाणी येथील टॉप स्टार स्पोर्ट्स क्लबतर्फे येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर आयोजित अरिहंत चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (ता.११) बोरगाव येथील अरिहंत सौहार्द संस्थेचे अध्यक्ष उत्तम पाटील यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर माजी आमदार प्रा. …

Read More »

खानापूरच्या विकास कामांकडे दुर्लक्ष केलेल्यांना जनताच धडा शिकवेल; डॉ. सोनाली सरनोबत

  खानापूर : सत्तेत असताना खानापूर तालुक्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केलेल्या काँग्रेस, जेडीएसने निवडणूका डोळ्यासमोर ठेवून यात्रेच्या नावाखाली जनतेशी संपर्क करू पाहत आहेत, असा आरोप खानापूर मतदारसंघातील संभाव्य भाजपा उमेदवार व ग्रामीण महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी केला आहे. काँग्रेस आमदारांनी आपल्या कार्यकाळात खानापूर तालुक्याचा कोणताच विकास केलेला नाही …

Read More »

खानापूरात भाजपच्या ए. दिलीप कुमार यांच्याकडून जनतेच्या भेटीगाठी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरात येत्या २०२३ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक झाले आहेत. अशातच भाजपमधून आणखी एक इच्छुक असल्याचे समजते. भाजपचे ए. दिलीपकुमार यांनी शनिवारी खानापूर शहरात आगमन केले. जांबोटी क्राॅस पासून शिवस्मारकापर्यंत शहरातील दुकानदाराच्या भेटी घेऊन त्यांना घड्याळ्यांचे वितरण करत संपर्क साधला. प्रारंभी शिवस्मारक चौकातील …

Read More »

राज्य सरकारकडून सर्व समावेशक विकास मॉडेलचे अनुसरण : राज्यपाल गेहलोत

  विधिमंडळ अधिवेशन सुरू बंगळूर : ‘अमृत काळा’च्या पुढील २५ वर्षांसाठी निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राज्य सरकार सर्वसमावेशक विकासाच्या मॉडेलचे अनुसरण करत असल्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी शुक्रवारी सांगितले. शुक्रवारपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले. यावेळी गेहलोत यांनी विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. राज्यपाल थावरचंद गेहलोत विधानसौदाच्या भव्य पायऱ्यांनी विधिमंडळात …

Read More »

डॉ. सोनली सरनोबत यांच्या हस्ते कणकुंबी येथील माऊली देवस्थानातील गणपती मंदिराचे उद्घाटन

  खानापूर : डॉ. सोनली सरनोबत यांच्या हस्ते कणकुंबी येथील माऊली देवस्थानातील जीर्णोद्धार करण्यात आलेल्या गणपती मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. तब्बल बारा वर्षानंतर माऊली यात्रा भरविण्यात अली आहे. दर बारा वर्षांनी माऊली भगिनींच्या भेटीचा सोहळा पार पडतो. मालप्रभा आणि म्हादाई नदीचे उगमस्थान रामेश्वर मंदिराजवळ आहे. डॉ. सोनाली सरनोबत यांनी प्रथम …

Read More »

खानापूर समितीकडे ज्येष्ठ नेते आबासाहेब दळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  खानापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले होते. त्यानुसार महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते आबासाहेब दळवी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज समितीकडे शक्तिप्रदर्शनाने सुपूर्द केला. म. ए. समिती इच्छुक उमेदवारांकडून 51 हजार रुपये अनामत रक्कम भरून अर्ज मागविण्याची प्रक्रिया राबविली होती. त्यानुसार आबासाहेब …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समिती माजी अध्यक्ष विलास बेळगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णाना फळ वाटप

    खानापूर (प्रतिनिधी) : कुसमळी (ता. खानापूर) तसेच खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी अध्यक्ष, जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीचे संस्थापक चेअरमन विलास बेळगावकर यांच्या ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शुक्रवारी दि. १० रोजी खानापूर सरकारी दवाखान्यातील रुग्णाना फळे वाटून करण्यात आला यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, म. ए. समितीचे अध्यक्ष …

Read More »

डीएफओ व्यंकटेश यांच्यावर लोकायुक्त छापा

  बेंगळुरू : लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बेंगलोर, रामनगर आणि कोलारमध्ये एकाच वेळी छापे मारले. बेकायदेशीरपणे मालमत्ता संपादन केल्याप्रकरणी कोलार डीएफओ व्यंकटेश यांना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी कोलार क्लॉक टॉवर जवळील विजयनगर, रामनगर, बेंगलोर येथील कोलार सोशल फॉरेस्ट ऑफिसर डीएफओ व्यंकटेश यांच्या फार्म हाऊसवर छापा टाकला आणि कागदपत्रांची तपासणी …

Read More »

खानापूर समितीकडे गोपाळ पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  खानापूर : विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीने इच्छुकांचे अर्ज सादर करण्यासाठी आवाहन केले आहे. यानुसार आज खानापूर विधानसभा मतदारसंघातून खानापूर म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते गोपाळ पाटील यांनी उमेदवारीसाठी अर्ज समितीकडे सादर केला आहे. अर्जदारांकडून ५१ हजार रुपये देणगीदाखल घेऊन म. ए. समिती अर्ज स्वीकारत आहे. गोपाळ पाटील …

Read More »

निपाणीत उद्यापासून “अरिहंत चषक” क्रिकेट स्पर्धेचा थरार

उत्तम पाटील यांची माहिती : चार लाखाची बक्षीसे निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समुहाच्या सहकार्याने निपाणी येथील टॉप स्टार स्पोर्ट्स क्लबतर्फे येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर शनिवारपासून (ता.११) अरिहंत चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रंदिवस प्रकाश झोतात आयोजित या स्पर्धेतील विजेत्या उपविजेत्या संघासह इतर वैयक्तिक …

Read More »