Saturday , June 6 2026
Breaking News

आप्पाचीवाडी फाट्याजवळ अपघातात एकाचा चेंदामेंदा

Spread the love

 

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर आप्पाचीवाडी फाट्याजवळ अपघातात एकाचा चेंदामेंदा झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली.
अपघातात निधन झालेल्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील आप्पाचीवाडी फाट्याजवळ कोल्हापूरहून निपाणी कडे जाणाऱ्या बाजूस असणाऱ्या उतारतीला अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. महामार्गावरून वाहनांची गती मोठ्या प्रमाणात असल्याने या मृतदेहावरून अनेक वाहने गेल्याने मृतदेहाचा चेंदामेंदा झाला आहे. अपघातापासून सुमारे अर्धा किलोमीटर मृतदेह फरपटत गेला. यामुळे महामार्गावर मृतदेहाचे मासाचे तुकडे इतरत्र पडले होते. अपघात विचित्र असल्याने कोल्हापूरहून निपाणीकडे जाणाऱ्या मोटरसायकल चालक महिलेला चक्कर आली. महामार्ग कर्मचाऱ्यांनी तिला पाणी देऊन थोडा वेळ विश्रांती घेण्यास सांगितले.
घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक रमेश पोवार, एस एस काडगौडर, संदीप गाडीवडर, राजू गोरखनावर, शिवप्रसाद यांनी घटनास्थळी पाहणी केली.

About Belgaum Varta

Check Also

सायकलच्या चाकाला ‘महागाईचा ब्रेक’; जानेवारीपासून चौथ्यांदा दरवाढ

Spread the love  स्पेअरपार्टच्या लहान कंपन्या अडचणीत निपाणी (वार्ता) : इंधन दरवाढ होण्यासह आरोग्यासाठी सायकल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *