खानापूर (प्रतिनिधी) : असोगा (ता. खानापूर) येथील श्री रामलिंगेश्वर मंदिर व श्री रवळनाथ मंदिराचा जीर्णोद्धार विधी व उद्घाटन सोहळा शुक्रवारी दि. ३ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग देव ट्रस्टचे अध्यक्ष जयवंत पाटील राहणार असुन श्री रामलिंगेश्वर मंदिराचे उद्घाटन भाजप नेते व श्री महालक्ष्मी …
Read More »महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक : डॉ. सोनाली सरनोबत
खानापूर : स्त्री शक्ती बचत गटांकडून हलसाल गावात हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नियती फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि खानापूर भाजप प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिलांनी शिक्षणाकडेही अधिक लक्ष केंद्रित करावे. …
Read More »मला पंतप्रधान बनवलं तरी भाजप-आरएसएस सोबत युती करणार नाही
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा भाजपावर हल्लाबोल बेंगळुरू : काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भारतीय जनता पार्टी, जनता दल सेक्युलर (जीडी-एस) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला आहे. सिद्धरामय्या म्हणाले की, भाजपा आणि जेडीएस या पक्षांकडे कोणतीही विचारसरणी नाही. या लोकांनी (भाजपा) मला राष्ट्रपती किंवा पंतप्रधान जरी बनवलं …
Read More »कुन्नूर शुटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत मालेगाव संघ ‘अरिहंत चषक’चा मानकरी
टेंभुर्णी संघ उपविजेता : प्रेक्षकांची भरभरून दाद निपाणी (वार्ता) : कुन्नूर येथील श्री दत्त शूटिंग व्हॉलीबॉल क्लब तर्फे कुन्नूर येथे अरिहंत उद्योग समूहातर्फे आयोजित ‘अरिहंत चषक’ शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत सोमवारी (ता.३०) रात्री उशिरा झालेल्या अटीतटीच्या लढतीत मालेगाव संघ अरिहंत चषकाचा मानकरी संघ ठरला. विजेत्या संघाला उत्तम पाटील, नगरसेवक संजय सांगावकर, …
Read More »जेडीेएसचे माजी पंतप्रधान देवेगौडा, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींसह राज्याध्यक्षांच्या उपस्थितीत खानापुरात भव्य कार्यक्रम
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर मतदारसंघाचे जेडीेएसचे उमेदवार नासीर बागवानचा ६६ वा वाढदिवसानिमित्त येत्या २ फेब्रुवारी रोजी येथील मलप्रभा क्रीडांगणावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जेडीेएसचे उमेदवार नासीर बागवान यांनी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली. प्रारंभी खानापूर तालुका जेडीएसचे अध्यक्ष एम. एम. सावकार यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. …
Read More »फेब्रुवारीत भरवणार कुंभार समाजाचा मेळावा
संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाच्या बैठकीत निर्णय खानापूर : दर पाच वर्षांनी खानापूर तालुका पातळीवर संत गोरा कुंभार समाज विकास मंडळातर्फे महामेळावा फेब्रुवारीत भरवण्याचा निर्णय रविवारी झालेल्या वार्षिक बैठकीत घेण्यात आला. या बैठकीचे आयोजन फुलेवाडी येथील आयोध्या नगरमध्ये करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भैरू कुंभार होते. बैठकीच्या …
Read More »कोगनोळीच्या चिमुकल्या आराध्याला महाराष्ट्र शासनाचा बालक्रीडा गौरव पुरस्कार
कोगनोळी : येथील बाळासाहेब पाटील बनाप यांची नात आराध्या पद्मराज पाटील या चिमुकल्या मुलीला कोल्हापूर येथे महाराष्ट्र शासनाचा बाल क्रीडा गौरव पुरस्कार देऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले. २६ जानेवारी रोजी सकाळी छत्रपती शाहू स्टेडीयम येथे कोल्हापूर जिल्ह्यातील “कला, क्रीडा, शैक्षणिक या क्षेत्रामध्ये …
Read More »खानापुरात मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे काम उल्लेखनीय
खानापूर : मराठी भाषा व मराठी संस्कृतीचे जतन करणारी संस्था म्हणजे मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मागील बारा वर्षांपासून मराठी भाषा टिकविण्यासाठी मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून हाती घेतलेले कार्य कौतुकास्पद आहे. कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चातून खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करून …
Read More »निडगल शाळेत कै. आनंदीबाई तोपिनकट्टी यांच्या स्मरणार्थ पारितोषिके वितरण
खानापूर (प्रतिनिधी) : निडगल (ता. खानापूर) येथील कै. आनंदीबाई तोपिनकट्टी यांच्या स्मरणार्थ त्याचे चिरंजीव व जीएसएस काॅलेजचे प्रा. भरत तोपिनकट्टी यांनी मराठी हायर प्राथमिक शाळा, निडगल येथे वार्षिक शैक्षणिक स्पर्धा पारितोषिक समारंभ 26 जानेवारी रोजी पार पडला. शालेय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व बौद्धिक विकास व्हावा यासाठी वर्षभर पाहिली ते सातवीच्या …
Read More »खानापूरचा लघु उद्योजक दिव्यांग पुंडलिक कुंभार यांना व्यवसायिक सेवा पुरस्कार प्रदान
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कुंभार समाजातील व डुक्कुरवाडी येथील लघु उद्योजक दिव्यांग पुंडलिक कुंभार यांना नुकताच व्यावसायिक सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रोटरी ई क्लब, डिस्ट्रिक्ट ३१७० तर्फे शनिवारी दि. २८ रोजी जी एस एस कॉलेज, बेळगाव येथे व्यावसायिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यावसायिक सेवा पुरस्कार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta