स्वागताची जय्यत तयारी, केंपेगौडांच्या पुतळ्याचे अनावरण बंगळूर : बंगळूरचे संस्थापक केंपेगौडा यांच्या १०८ फूट उंच पुतळ्याच्या अनावरणासह विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी बंगळुरमध्ये दाखल होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी उद्याननगरी सज्ज झाली आहे. तसेच वाहतूक व्यवस्थेतही काही बदल करण्यात आले असून शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्तात वाढ करण्याात आली …
Read More »खानापूरात जागर लोक संस्कृतीचा कार्यक्रम शनिवारी
खानापूर (प्रतिनिधी) : लोक संस्कृती नाट्य कला संस्था प्रस्तुत शाहिर अभिजीत कालेकर लिखीत खानापूर तालुक्यातील कलाकारांनी एकत्रीत येऊन तयार केलेल्या लोकसंस्कृतीची ओळख करून देणाऱ्या जागर लोकसंस्कृतीचा कार्यक्रम शनिवारी दि. १२ रोजी सायंकाळी ६ वाजता खानापूर येथील अर्बन बँक समोर आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला संस्कृतीचे संस्थापक दादासाहेब …
Read More »सतीश जारकीहोळी यांच्या बदनामीच्या विरोधात कार्यकर्त्यांचा विराट मोर्चा
संभाजी राजे चौकात मानवी साखळी : तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : माजी मंत्री व केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी हे सर्व जातीधर्मांचा आदर करणारे आहेत. त्यांनी केलेले वक्तव्य हे कोणत्या धर्माविरोधात नव्हते. तर केवळ एका शब्दाचे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. त्याला ऐतिहासिक व साहित्यिक आधार होता. असे असताना काही …
Read More »कोगनोळी दूधगंगा नदीत 70 वर्षीय इसमाचा मृतदेह
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जवळ असणाऱ्या दूधगंगा नदीत 70 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना गुरुवार तारीख 10 रोजी सकाळी उघडकीस आली. सावर्डे बुद्रुक तालुका कागल येथील ज्ञानदेव दामू पाटील असे नाव असल्याचे प्राथमिक अंदाज बांधण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील दूधगंगा नदीमध्ये …
Read More »निपाणीत शनिवारपासून फुटबॉल स्पर्धा
अरिहंत चषक फुटबॉल स्पर्धा : लाखाचे पहिले बक्षीस निपाणी (वार्ता) : येथील निपाणी फुटबॉल ॲकॅडमीच्या आयोजनाखाली उत्तमअण्णा युवा शक्ती व अरिहंत उद्योग समूहाच्या वतीने शनीवार (ता.१२) पासून समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्याची युद्ध पातळीवर तयारी सुरु आहे. प्रेक्षकांच्यासाठी गॅलरी, खेळाडुंच्या जेवण व राहण्याची …
Read More »खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी समिती बैठकीत विविध विषयांवर चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील पाणी पुरवठा, गटारी, मोक्ष धाम दुरूस्ती, अतिक्रमण घर बांधणी आदी विषयांवर खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या गुरूवारी पार पडलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती चेअरमन प्रकाश बैलूरकर होते. तर व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलिपी, चीफ ऑफिसर बाबासाहेब माने आदी उपस्थित होते. यावेळी प्रेमानंद …
Read More »खेमेवाडीत वीज पुरवठा सुरळीत करा; ग्रामस्थांची मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : खेमेवाडी (ता. खानापूर) हे गाव इदलहोंड ग्राम पंचायतीच्या हद्दीत येते. या गावाला गेल्या काही दिवसापासून वीज पुरवठा सुरळीत नाही. त्यामुळे खेमेवाडी ग्रामस्थांना अंधाराशी सामना करावा लागत आहे. या वैतागलेल्या खेमेवाडी नागरिकांनी हेस्काॅम खात्याला वारंवार टी सी बदलुन वीजपुरवठा सुरळीत करा, अशा मागणीचे निवेदन हेस्काॅमच्या अभियंत्या कल्पना …
Read More »निपाणी ऊरूसातील मानाच्या फकीरांची रवानगी
कमिटी पदाधिकारी, मानकऱ्यांची उपस्थिती : फकीरांना बिदागीचे वितरण निपाणी (वार्ता) : सर्वधर्मियांच्या ऐक्याचे प्रतिक श्री संत बाबामहाराज चव्हाण प्रस्थापित दर्गा महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब ऊरूसानिमित्त विविध ठिकांणाहून दर्गाह मंडपात दाखल झालेल्या मानाच्या फकिरांची रवानगी परंपरेप्रमाणे चव्हाण वारसांच्या हस्ते भंडारखान्याचे साहित्य सुपूर्द करून करण्यात आली. यावेळी उरूस कमिटी अध्यक्ष …
Read More »जारकीहोळी यांचा वाल्मिकी, रामायण ग्रंथ आणि श्रीरामावर विश्वास आहे का? : मुख्यमंत्री बोम्माई
खानापूर : वाल्मिकी श्रेष्ठ कुलतिलक, तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे का..? तुमचा महर्षि वाल्मिकींचा रामायण ग्रंथ आणि श्रीरामावर विश्वास आहे का? असा सवाल करत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांना तुम्ही आधी या प्रकरणाचा खुलासा करा असे खुले आव्हान दिले. खानापूर शहरातील मलप्रभा मैदानावर आयोजित भाजप जनसंकल्प …
Read More »सातव्या वेतन आयोगाची स्थापना
मुख्यमंत्री बोम्मईंची घोषणा बंगळूर : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली असून बहुप्रतिक्षित सातवा वेतन आयोग स्थापन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. दावणगेरे येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणा आणि इतर सुविधांच्या विस्तारासंदर्भात राज्य सरकारचे निवृत्त मुख्य सचिव सुधाकर राव यांच्या अध्यक्षतेखाली सातव्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta