75 रुग्णांची तपासणी : मोफत औषध उपचार
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या टोलनाका व जीवम आय हॉस्पिटल कोगनोळी यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर घेतले. यावेळी 75 रुग्णांची तपासणी नेत्रतज्ञ डॉक्टर नूतन चौगुले मगदूम यांनी केले.
या शिबिराचे उद्घाटन टोल नाका व्यवस्थापक अजित सिंग यांच्या हस्ते झाले.
सदाशिव लकडे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टोलनाका यांच्यावतीने सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाचे औचित्य साधून जीवम आय हॉस्पिटल यांच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये टोल नाका कर्मचारी महामार्गावरील वाहनधारक यांची मोफत नेत्र तपासणी करून औषधोपचार करून अल्प दरात चष्मे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले.
या शिबिरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया अल्प दरात करून देण्यात येणार असल्याचे डॉक्टर नूतन चौगुले यांनी सांगितले.
यावेळी अंकिता आज्जेकर, विशाल स्वामी, अनुराधा कांबळे, कोमल चौगुले, नवीन कुमार, इरफान खान, संदीप डोंगळे, रुकज चौगुले, बाबासाहेब मगदूम यांच्यासह अन्य टोल नाका कर्मचारी वाहनधारक उपस्थित होते.