Saturday , February 8 2025
Breaking News

निवडणुका टाळण्यासाठीच चुकीची मतदारसंघ पुनर्रचना

Spread the love
राजेंद्र वडर यांचा आरोप : अधिकाऱ्यांची मनमानी
निपाणी (वार्ता) : जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणूक कार्यकाळ संपून वर्ष लोटले आहे. पण शासनाकडून या निवडणुका घेण्यासाठी कार्यवाही होताना दिसत नाही. निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठीच मतदारसंघ पुनर्रचना चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. सरकारला आता निवडणूक घेतल्यास त्यांचा पराभव निश्चित वाटत आहे. त्यामुळेच निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठी पुन्हा एकदा मतदारसंघ पुनर्रचना चुकीची केल्याचा आरोप भोज जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य राजेंद्र वडर यांनी केला.
गळतगा येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
वडर म्हणाले, प्रत्येक गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, रस्ते, गटारी, पिण्याचा पाण्याची समस्या, ग्रामपंचायतीमधील सर्व कामे जिल्हा पंचायतीच्या अखत्यारीत केले जाते. पण गेल्या वर्षभरापासून मनमानी कारभारचालविला आहे. विधान परिषद निवडणुकीपूर्वीच यानिवडणुका घेणे गरजेचे होते. तरीही या निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहेत. आता पुन्हा एकदा नव्याने जिल्हा आणि तालुका पंचायत मतदारसंघ पुनर्रचना करण्यात आली आहे. पण पूर्णतः चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे.
याबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे तक्रार दाखल झाल्यास पुन्हा निवडणुका लांबणीवर टाकल्या जाऊ शकतात. गळतगा आणि कारदगा जिल्हा व तालुकापंचायत मतदारसंघात वर्षभरात कोणतेही काम झालेले नाही. त्यामुळे शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी वडर यांनी केली आहे.
अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार प्रशासक राजमुळे अधिकारी हे मनमानी कारभार करत आहेत. जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत सदस्य नसल्याने स्थानिक आमदारांच्याकडून ज्या ज्या गावात आपली सत्ता नाही त्या गावातील विकासकामे थांबवण्याचे षड्यंत्र सुरू आहे. गळतगा आणि कारदगा  या ठिकाणी  वर्षभरापासून जिल्हा आणि तालुका पंचायत फंडातून कोणतीच कामे झालेली नाहीत. विकासकामांना गती देण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी तालुका आणि जिल्हा पंचायतनिवडणूक घ्याव्यात, अशी मागणी राजेंद्र पवार -वडर यांनी केली.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आप्पाचीवाडीत मंगळवारी मोफत सीईटी फॉर्म

Spread the love  निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, कुरली, हदनाळ, भाटनांगनूर, सुळगाव, मतिवडेसह निपाणी तालुक्यातील बारावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *