सौंदलगा (वार्ताहर) : सौंदलगासह परिसरात शनिवारी गौरीचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. गौरीच्या प्रतिष्ठापणेची तयारी महिलांनी जोरदार केली होती. गौरी गणपतीच्या सणासाठी माहेरवाशींनी आल्या असून, प्रत्येक घरामध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक गल्लीमध्ये गौरीची गाणी, झिम्मा फुगडीचा फेर धरला जात आहे. शनिवारी सकाळपासून दुपारपर्यंत अनेक ठिकाणी घरोघरी गौरी नेण्यासाठी …
Read More »विद्यार्थ्यांनो कष्टाशिवाय पर्याय नाही : डॉ. सागर माळी
सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुरुकुल विभागांतर्गत आयोजित करिअर मार्गदर्शन करताना विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या गोवा येथे प्राध्यापक म्हणून कार्य करणारे डॉ. सागर पांडुरंग माळी म्हणाले की, विद्यार्थी दशेत प्रत्येक विद्यार्थ्याने कष्ट केलेच पाहिजे म्हणजेच आपण अभ्यास केला पाहिजे अभ्यास कसा करावा अभ्यास करताना …
Read More »चापगाव फोंडेश्वर मंदिर परिसर होणार प्रकाशमय : उद्योजक मारुती पाटील यांची ग्वाही
खानापूर : चापगाव येथील श्री फोंडेश्वर मंदिरासमोर मोठा सव्वादोन लाख रुपये खर्चून हॅलोजन बल्ब बसवण्याची ग्वाही कौंदल गावचे सुपुत्र व पुणे येथे स्थायिक असलेले उद्योजक मारुती पाटील यांनी दिली. यावेळी ग्रामस्थांनी ज्येष्ठांच्या हस्ते त्यांचा सत्कार करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. येत्या दोन महिन्यात काम पूर्णत्वाला नेईन, असे सत्कार प्रसंगी बोलताना …
Read More »दहावी परीक्षेत ध्येय, चिकाटी ठेवून अभ्यास केला तर यश नक्कीच : आम आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील
खानापूर (प्रतिनिधी) : दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यातील व पहिली परीक्षा आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी ठेवून अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते. यासाठी सतत अभ्यास करा, असे आवाहन खानापूर तालुका आम आदमी अध्यक्ष भैरू पाटील यांनी दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतलेल्या ओलमणी येथील राजश्री शाहु …
Read More »हत्तरगुंजी, मुडेवाडी, फुलेवाडी (डुक्करवाडी) गावच्या समस्या राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी सोडवाव्यात, ग्रामस्थांची मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव व पणजी राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असलेल्या हत्तरगुंजी, मुडेवाडी व फुलेवाडी या तिन्ही गावांची झालेली समस्या राष्ट्रीय महामार्गावरून गावांमध्ये जाताना सर्व्हिस रोड, दुभाजक न सोडल्यामुळे या तिन्ही गावच्या लोकांना बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. कारण खानापूरकडून हत्तरगुंजी गावामध्ये वळताना दुभाजक न सोडल्यामुळे त्या लोकांना गणेबैल …
Read More »‘ऑपरेशन मदत’तर्फे राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण शिक्षण अभियानाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या प्रयोगाअंतर्गत वनशेतीचा प्रारंभ
खानापूर : खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या गोल्याळी गावातील सरकारी शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना घेऊन ‘ऑपरेशन मदत’ ग्रुपतर्फे वनशेतीचा प्रारंभ करण्यात येणार आहे. हा प्रयोग ग्रामीण शिक्षण अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, याद्वारे पर्यावरणीय समतोल राखला जाईल व सेंद्रिय शेतीचा विकास टप्प्याटप्प्याने करण्यात येईल, असे राहुल पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना …
Read More »सागरी सामर्थ्य विकसित करण्यास सरकार उत्सुक : पंतप्रधान नरेंद्र मोदी
मंगळूरात ३८०० कोटीच्या प्रकल्पांचा शुभारंभ बंगळूर : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले सागरी सामर्थ्य बळकट करण्यासाठी सरकार उत्सुक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता. २) मंगळूर येथे सांगितले. अनेक पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि न्यू मंगळूर बंदर प्राधिकरण आणि मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड यांच्याशी संबंधित तीन हजार ८०० …
Read More »निपाणी येथील महादेव गल्ली गणेशोत्सव मंडळाचे उपक्रम स्तुत्य
पोलीस उपाधीक्षक बसवराज एलिगार : मंडळातर्फे सत्कार समारंभ निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात गणेशोत्सव मंडळांची रूपरेषा बदलत चालली आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सवाचा मूळ उद्देशच बाजूला पडत चालला आहे. अशा परिस्थितीमध्ये येथील महादेव गल्लीतील गणेशोत्सव मंडळातर्फे संस्कृती, परंपरा जपत अनेक समाज उपयोगी उपक्रम राविण्यात येत आहेत. या मंडळाचा आदर्श …
Read More »वल्लभगडात सेवानिवृत्त सुभेदार पांडुरंग बोरे यांचे जंगी स्वागत…
संकेश्वर (महंमद मोमीन) : वल्लभगड गावाचे सुपुत्र सुभेदार पांडुरंग बंडू बोरे हे मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये २८ वर्षांची उत्तम सेवा बजावून सेवानिवृत्त झाले. ते गावाकडे परतले असता वल्लभगड येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. वल्लभगडात आदर्श युवक ढोल ताशा पथकाच्या निनादात सेवानिवृत्त सुभेदार पांडुरंग बोरे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. …
Read More »पीरमाळ येथे चक्क गणेश मूर्ती ट्रकवर प्रतिष्ठापना
कोगनोळी, ता. 2 : येथील पीरमाळ येथे असणाऱ्या पीटीएम तरुण मंडळांनी आपली गणेश मूर्ती ट्रकमध्येच प्रतिष्ठापना करून एक वेगळेपण जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. पीटीएम तरुण मंडळ प्रतिवर्षी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांची जोपासना करत आहे. चालू वर्षीही या ठिकाणी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या ठिकाणी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना संतोष …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta