Wednesday , December 17 2025
Breaking News

कर्नाटक

जांबोटीतील राजवाडा रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटच्या कामाचा प्रारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटीतील (ता. खानापूर) गावच्या राजवाडा रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटच्या कामाचा प्रारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी भाजप नेत्या धनश्री सरदेसाई यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला. सदर राजवाडा रस्त्याच्या सीसी रोडसाठी माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवठगीमठ यांच्या फंडातून या निधी मिळाला असुन …

Read More »

टक्के कमिशनसंदर्भात लोकायुक्तांकडे तक्रार करा : मुख्यमंत्री बोम्मई

  विरोधी पक्षनेत्यांना कंत्राटदार संघटनेचे निवेदन, आंदोलनाचा इशारा बंगळूर : कर्नाटक राज्य कंत्राटदार संघटनेच्या सरकारी कंत्राटांमध्ये ४० टक्के कमिशनच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लोकायुक्तांकडे तक्रार करण्यास सांगितले. कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि विरोधी पक्षनेते सिध्दरामय्या यांना निवेदन देऊन कमिशनच्या तक्रारीवर …

Read More »

संकेश्वरात बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू

संकेश्वर (महंमद मोमीन):  संकेश्वरात विघ्नहर्ता श्री गजाननाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झालेली दिसत आहे. गेली दोन वर्षे झाली कोरोनाच्या जाचक नियमांमुळे बाप्पांचा उत्सव भक्तगणांना दिमाखात साजरा करता आला नाही. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव धामधुमीत साजरा करण्याची आतापासूनच तयारी चाललेली दिसत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते मंडप उभारणी, देखावा आणि बाप्पांच्या आगमनाची …

Read More »

पाणंद रस्त्यावरील अतिक्रम हटवा; सौंदलगा ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन

  नागरिकांची होते गैरसोय निपाणी(वार्ता) सौंदलगा गावाबाहेर पूर्वेकडे असलेल्या गणेश देवस्थान (साळुंखेवाडी) पाटी ते लोहारकी शेतीपर्यंत सरकारी पाणंद रस्ता अतिक्रमण हटवावे अशा मागणीची निवेदन ग्रामस्थांच्यावतीने तहसीलदार, ग्रामतलाठी व ग्रामपंचायत प्रशासनाला मंगळवारी (ता.२३) देण्यात आले. सौंदलगा गावाजवळ गणेश देवस्थान पाटी ते सर्वे नंबर २४ व सर्वे नंबर २५ दोन्हीच्या मधील सरकारी …

Read More »

बरगावात श्रीमहालक्ष्मी मंदिराचा काॅलम भरणी उत्साहात

खानापूर (प्रतिनिधी) : बरगाव (ता. खानापूर) येथील श्रीमहालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार करून उभारण्यात आलेल्या श्रीमहालक्ष्मी मंदिराच्या इमारतींचा काॅलम भरणी कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी श्रीमहालक्ष्मी मंदिराच्या इमारतीचा पाया भरणी भाजप नेते व श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर, बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील, करंबळ ग्राम पंचायत …

Read More »

गर्लगुंजीत श्रावणी सोमवारी निमित्त परव उत्साहात

  खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत माऊली मंदिरात श्रावणी सोमवारी निमित्ताने परव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्राम दैवत माऊली मंदिर आकर्षकरित्या विद्युत रोषणाई करण्यात आली होती. माऊली देवीची विधिवत पुजा करण्यात आली. यावेळी गावातील देव घरातुन वाद्याच्या गजरात पालखी मंदिराकडे प्रयाण करण्यात आली. यावेळी परव …

Read More »

संकेश्वरात श्री संतसेना महाराजांची पुण्यतिथी साजरी

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात श्री संतसेना महाराजांची पुण्यतिथी भक्तीभावाने साजरी करण्यात आली. येथील श्री संतसेना नाभिक समाजातर्फे श्री संतसेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संकेश्वर नदी गल्लीतील श्री संतसेना मंदिरात मंगळवार दि. २३ रोजी रात्री पेदरवाडी तालुका आजारा येथील भजनी मंडळाने भजनाचा कार्यक्रम सादर केला. आज सकाळी …

Read More »

पीक नुकसान भरपाई त्वरित मिळावी

  राजू पोवार : रयत संघटनेतर्फे निपाणी तहसिलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : डोणेवाडी येथील अनुष्का भेंडे प्रकरण, निपाणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या सोयाबीन, मका, भूईमुग, भात, ऊस व इतर कडधान्ये पिके यांचे नुकसान झाले आहे. त्याचा ताबडतोब सर्वे करून शेतकर्‍यांना एकरी 25 हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी, यासाठी रयत संघटनेतर्फे …

Read More »

अखेर खानापूर-रामनगर महामार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात

खानापूर : खानापूर रामनगर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्याच्या दुरावस्थेसंदर्भात शिंदोली ग्राम पंचायतच्या माध्यमातून तहसीलदारांना निवेदन तसेच खानापूर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कार्यालयात जाऊन जाब विचारून त्यांना धारेवर धरण्यात आले होते. त्यावेळी संबंधित अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष जाऊन रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी केली. तातडीने नवीन कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराशी संपर्क साधून दिला. त्यांना रस्त्याच्या दयनीय …

Read More »

कुप्पटगिरी नाल्यावरील पूल खचल्याने वाहतुक ठप्प

  खानापूर (प्रतिनिधी) : कुप्पटगिरी (ता. खानापूर) गावाच्या नाल्यावरील पूल गेल्या महिनाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे खचल्याने कुप्पटगिरी गावाला या नाल्यावरून ये-जा होणारी वाहतुक ठप्प झाली आहे. त्यामुळे कुप्पटगिरी गावाच्या नागरिकांना खानापूर शहराला जाणारा जवळचा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे कुप्पटगिरी नागरिकांना अनेक समस्या तोंड द्यावे लागत आहे. याची दखल घेऊन …

Read More »