Sunday , December 14 2025
Breaking News

कर्नाटक

पतीला मृत्यूच्या दाढेतून वाचविलेल्या आधुनिक सावित्रीचा गौरव

बोरगाव येथे पाटील दाम्पत्यांचा सत्कार : अष्टविनायक मित्र मंडळाचा उपक्रम निपाणी (वार्ता) : कुटुंब सांभाळत संकटकाळी आपल्या पतीस मृत्युच्या दाढेतून सुटका करण्यासाठी जेंव्हा महिला धडपडते तीच खरी सावित्री बनते. पती संदीप पाटील यांना किडनी देऊन त्यांचा प्राण वाचवलेल्या राजश्री पाटील या खऱ्या अर्थाने आधुनिक सावित्री असल्याचे जाणुन बोरगाव येथील अष्टविनायक …

Read More »

पर्यावरण वाचवा वसुंधरा वाचवा : दिलीप शेवाळे

सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल सौंदलगा या शाखेत पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानामध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलताना न्यू सेकंडरी स्कूल भोजचे विज्ञान शिक्षक श्री. दिलीप शेवाळे सर म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याने पर्यावरणाची काळजी घेणे गरजेचे आहे. ती घेतली तरच पृथ्वी व पृथ्वीतलावरील सर्वजण जगणार आहोत. जगातील …

Read More »

खानापूर समितीच्या शिष्टमंडळाने घेतली मध्यवर्तीची भेट!

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती (दिगंबर पाटील) गटाचे शिष्टमंडळ आज मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांना भेटले. या बैठकीत एकी संदर्भात चर्चा करण्यात आली. सुरूवातीला मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सीमाप्रश्नाच्या दाव्यासंबंधीची माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर खानापूर समितीचे ज्येष्ठ नेते आबासाहेब दळवी यांनी खानापूर म. ए. समितीच्या एकीच्या प्रक्रियेचा सविस्तर वृत्तांत मध्यवर्तीच्या …

Read More »

अग्निपथच्या विरोधात आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचे उद्या उपोषण

खानापूर : अग्निपथच्या विरोधात आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर उद्या रविवार दि. १९/०६/२०२२ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत शिवस्मारक चौक खानापूर येथे लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत. तरी खानापूर तालुक्यातील तरूणांनी व जनतेनी उद्याच्या उपोषणामध्ये आमदार अंजलीताईंच्या सोबत सहभागी व्हायचे आहे व युवकांवरील अन्यायाला वाचा फोडायची आहे.

Read More »

जांबोटी भागातील समस्यांबाबत आम आदमीचे तहसीलदाराना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील निलावडे येथील रेशन दुकानाला कोकणवाडा ग्रामस्थाना, जांबोटी येथील रेशन दुकानाला के. सी. कापोली, विजयनगर ग्रामस्थाना, तिर्थकुंडे रेशन दुकानाला कौलापूरवाडा ग्रामस्थाना जंगलातून ये-जा करावी लागते. तसेच एक दिवस थम देण्यासाठी व एक दिवस रेशन घेण्यासाठी यावे लागते. यासाठी आठवड्यातून एक दिवस गावात येऊन रेशन …

Read More »

तब्बल दोन वर्षांनंतर पंढरपूर पायी वारीचा योग

संकेश्वर (महंमद मोमीन) : कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे झाली पंढरपूर पायी वारीचे भाग्य संकेश्वरातील वारकरींना लाभले नाही. यंदा संकेश्वर परिसरातील वारकरींना पायी वारीचा योग आला आहे. संकेश्वर येथील श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी पायी दिंडी सुरू होऊन ४५ वर्षे झाली. येत्या २८ जून २०२२ रोजी सकाळी ७ वाजता संकेश्वर श्री …

Read More »

अन् हिरण्यकेशी उलटी वाहू लागली….

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर-नांगनूर भागातील नागरिकांना आज प्रथमच आगळं-वेगळं असे कांहीतरी पहावयास मिळाले. हिरण्यकेशी नदीचा प्रवाह उलट्या दिशेने वाहताना दिसला. हे आगळे वेगळे अन् अफलातूनची करामत पहाण्यासाठी लोक भरपावसात गोटूर बांधाऱ्यावर जमा झालेले दिसले संकेश्वरात आज पाऊस बऱ्यापैकी कोसळला पण कमतनुरला पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे कमतनूर ओढ्याच्या पाण्याने …

Read More »

‘अग्निपथ’ विरोधात निपाणीत युवकांचा आक्रोश मोर्चा

तगडा पोलिस बंदोबस्त : तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन निपाणी (वार्ता) : संरक्षणासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रात संरचात्मक बदल करणारी एखादी योजना आणली जात असेल तर तत्पूर्वी ती प्रायोगिक तत्वावर राबवणं गरजेचे आहे. ‘अग्निपथ योजने’त सहभागी होणाऱ्या युवकाना कुठलेही कायमस्वरूपी काम नसल्याने आणि सैनिकांना निवृत्तीनंतर मिळणारे इतर लाभ नाही. त्यामुळे निपाणी भागातील शेकडो युवकांनी …

Read More »

संकेश्वरात बळीराजा खूश हुआ…

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात पावसा अभावी खरीप पेरण्या लांबणीवर पडल्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आकाशाकडे डोळा लावून बसला होता. आज पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी (बळीराजा) खूश झालेला दिसत आहे. संकेश्वर परिसरात तीन तास बरसलेल्या दमदार पावसाने शेतशिवारात पाणीच-पाणी झालेले दृश्य पहावयास मिळत आहे. मृग जाता-जाता बरसणार असा अंदाज हवामान …

Read More »

हदनाळ-मत्तीवडे रस्त्यावर शेतकऱ्यांचे अतिक्रमण

कारवाई करण्याची मागणी कोगनोळी : हदनाळ ते मत्तीवडे या सीमाभागातील ६ किलोमीटरच्या महाराष्ट्र-कर्नाटक रस्त्यावर महाराष्ट्र हद्दीतील शेंडूर (ता. कागल) येथील काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. या मार्गावरील वाहतुकीसाठी सोईचा असणारा हा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी अडचण निर्माण होत आहे. सदर शेतकऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी हदनाळकरांनी …

Read More »