खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीतून कम्प्युटर उताऱ्यासंदर्भात नेहमीच शेतकरीवर्गाना, सामान्य नागरिकांना आडचण होत आहे. कम्प्युटर उतारा मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला कर्ज काढताना, शेतीच्या कामासाठी कॅप्यूटर उतारा वेळेत मिळत नाही. त्यामुळे सर्व जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने …
Read More »संकेश्वरात मुलांचा शिमगा चालू…
संकेश्वर (प्रतिनिधी) : उद्या गुरुवार दि. १७ रोजी हुताशनी पौर्णिमा होळी असल्यामुळे आज संकेश्वरात मुले-मुली युवक सार्वजनिक होळीसाठी टिमक्यांच्या निनादात घरोघरी जाऊन शिमगा करीत शेणकूट लाकडे, सरपण आणि देणगी गोळा करतानाचे चित्र पहावयास मिळाले. शेतकरी कुटुंबातील घरांत शेणकूट, सरपण तर मोजक्याच घरांत लाकडे सार्वजनिक होळीसाठी मिळताना दिसली. प्रत्येकाच्या घरात आज …
Read More »योग करा निरोगी राहा : अमर नलवडे
संकेश्वर (प्रतिनिधी) : योग-प्राणायम करा, निरोगी राहा, असे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे यांनी सांगितले. ते संकेश्वर साई भवन येथे ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्रातर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांचे उदघाटन करुन बोलत होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्राचे योगशिक्षक बसवराज नागराळे यांनी भूषविले होते. …
Read More »देवलत्ती श्री लक्ष्मी यात्रेसाठी परवानगी द्या…
देवलत्ती (ता. खानापूर) गावच्या श्री लक्ष्मीदेवी यात्रेत्सवाला परवानगी देण्याबरोबरच यात्रेच्या ठिकाणी वीज, पाणी आदी आवश्यक मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी देवलत्ती ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. देवलत्ती (ता. खानापूर) येथील ग्रामस्थांनी आज बुधवारी सकाळी बेळगाव ग्रामीण भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त …
Read More »मे मध्ये द.भा. जैन सभेचे शंभरावे अधिवेशन
मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर : बोरगावमध्ये संवाद बैठक निपाणी (वार्ता) : कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे १५ मे च्या दरम्यान द. भा. जैन सभेचे शंभरावे अधिवेशन भव्य स्वरुपात सांगलीत होणार आहे. त्यासाठी लाखाच्या संख्येत जैन समुदाय उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री आदित्य …
Read More »संकेश्वरची अन्यायकारक पाणीपट्टी बंद करा : मुस्तफा मकानदार
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेला लोकांची चिंता आहे की नाही. गेल्या दोन वर्षांपासून संकेश्वरातील लोक कोरोना महामारीने कंगल झाले आहेत. बऱ्याच युवकांना नोकरी गमवावी लागली आहे. व्यापार-व्यवसाय घाट्यात चालवला आहे. त्यामुळे गोरगरिब, कष्टकरी सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. अशा स्थित पालिकेची आव्वाची-सव्वा पाणीपट्टी लोक भरणार कोठून हा प्रश्न निर्माण …
Read More »संकेश्वरात रंगोत्सव रविवारी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात धुलीवंदन- रंगपंचमी एकाच दिवशी येत्या रविवार दि. २० मार्च २०२२ रोजी साजरी करण्याचा निर्णय आज पोलीस ठाण्यावर झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. सभेत माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी म्हणाले, धुलीवंदन असो रंगपंचमी ज्या-त्या दिवशी साजरे केल्यास सणांचे महत्व टिकून राहणार आहे. अधे-मधे सण समारंभ साजरी करण्याची …
Read More »हंचिनाळ सरकारी मराठी मुलांच्या शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
तिसऱ्यांदा मिळाला शाळेला एल आय सी चा सन्मान. हंचिनाळ : येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे निपाणी शाखेचे शाखाधिकारी संजय कदम यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आडी. हंचिनाळ ग्रामपंचायतीचे चेअरमन बबन हवलदार. हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विकास अधिकारी शेखर …
Read More »खानापूर पशुखात्याच्या डॉ. दादमीची बढतीनिमित्त बदली
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील पशुखात्याचे पशुवैद्यकीय डाॅ. मनोहर बी. दादमी यांची बागलकोट जिल्हापदी मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून बढतीनिमित्त बदली झाली आहे. त्यांना खानापूर पशुखात्याच्या वतीने निरोप समारंभ नुकताच पार पडला. यावेळी डॉ. मनोहर बी. दादमी यानी खानापूर तालुक्यात २०१७ पासुन पशु डाॅक्टर म्हणून गेली पाच वर्षे सेवा बजावली. सन …
Read More »ममदापूरमध्ये रंगला माऊली आश्वाचा रिंगण सोहळा!
मान्यवरांची उपस्थिती : आठवडाभराच्या विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता निपाणी : टाळ-मृदंगांचा गजर, विठू माऊलीचा जयघोष आणि निपाणी परिसरातील वारकऱ्यांच्या उपस्थितीत ममदापूर (के. एल.) येथे मंगळवारी (ता.१५) माऊली अश्वाचा रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर महाप्रसादाचा वाटप आणि आठवडाभर सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. प्रारंभी युवानेते उत्तम पाटील आणि ममदापूर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta