Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटक

मणतुर्गे येथे श्री. रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार कमिटीच्या वतीने हळदीकुंकू उत्साहात

  खानापूर : मणतुर्गे येथे श्री. रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार कमिटीच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून मणतुर्गे येथे महिलांचा हळदीकुंकू समारंभ दि. 20 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सुप्रिया मारुती पाटील तर स्वागताध्यक्ष सौ. आश्विनी राजाराम गुंडपिकर या होत्या. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हळदीकुंकू …

Read More »

खानापूर तालुक्याच्या लिंगनमठ गावात मृतदेह रस्त्यावर ठेवून गावकऱ्यांचे आंदोलन!

  खानापूर : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने गावकऱ्यांनी मुख्य रस्त्याच्या मधोमध मृतदेह ठेवून निषेध केला. बेळगाव जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील लिंगनमठ गावात ही घटना घडली. खानापूर तालुक्यातील लिंगनमठात स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही. अनेकवेळा ग्रामस्थांनी ही बाब महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिली असली तरी अधिकाऱ्यांनी देखील याची दखल घेतली नाही. दरम्यान दि. …

Read More »

निधी अभावी नंदगड भागातील विकास कामे रखडली

  नंदगड यात्रा कमिटीने घेतली माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची भेट खानापूर : नंदगड गावची लक्ष्मी यात्रा तोंडावर येऊन ठेपली आहे. निधी अभावी नंदगड भागातील बरीच विकास कामे रखडली आहेत. आमदर फंडातून जेमतेम पाच लाखाचा निधी नंदगड गावासाठी दिला असून हा फंड खूपच कमी असल्याची तक्रार नंदगड यात्रा कमिटीने …

Read More »

बेळगाव येथील तरूणांकडून बैलूर येथील महिलेस बेदम मारहाण!

  खानापूर : बेळगाव येथील तरूणांच्या टोळक्याने महिलेस बेदम मारहाण करून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बैलूर (ता. खानापूर) येथे घडली आहे. या घटनेत लक्ष्मी रवळू कागणकर (४५) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेळगाव येथील श्रीधर पाटील याच्यासह अन्य आठ जणांवर …

Read More »

सदलगा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये गुरुदेव सन्मान पुरस्कार २०२४-२५ चे चार मानकरी

  स्वप्नं मोठ्ठी पहा, मोठ्ठी ध्येयं ठेवा, जिज्ञासा जागृत ठेवा : डॉ. प्रकाश तेवरी सदलगा : सदलगा  इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये यावर्षी गुरुदेव सन्मान पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केएलई टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ प्रकाश तेवरी होते. हा पुरस्कार सदलगा हायस्कूलचे माजी विद्यार्थी आणि जनरल इलेक्ट्रिकल्स (जीई) या अमेरिकन …

Read More »

चिमुकल्यानी भाजी आणली अन विकलीही!

  नूतन मराठी विद्यालयात आठवडी बाजार निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयातील चिमुकल्यांनी आठवडी बाजार भरून त्यामध्ये भाजी आणली आणि विकलीही. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या, वह्या पेन खाद्यपदार्थ आणले होते.या बाजाराला पालकासह परिसरातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. संस्थेच्या अध्यक्षा प्राचार्या ए. सी. …

Read More »

क्रूझरचे टायर फुटून भीषण अपघात; शालेय विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू

रायचूर : राज्यात पहाटेच्या सुमारास झालेल्या दोन भीषण अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला.  यल्लापूरमध्ये लॉरी उलटून 14 जणांचा मृत्यू झाला, तर रायचूरमध्ये क्रुझरच्या अपघातात तीन विद्यार्थ्यांसह चार जणांचा मृत्यू झाला असल्याचे समजते. रायचूरच्या सिंदनूर तालुक्यातील अरगिनमर कॅम्पजवळ भीषण अपघात झाला. क्रुझरचे टायर फुटून वाहन रस्त्याच्या मधोमध पलटली.  या अपघातात मंत्रालय …

Read More »

यल्लापूर येथे भीषण अपघात : 14 ठार

  यल्लापूर : उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील गुळ्ळापुरजवळ भाजीपाला भरलेली लॉरी पलटी होऊन 14 जण ठार झाल्याची घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग 63 वर आज सकाळी ही दुर्घटना घडली. भाजीपाल्यांनी भरलेल्या लॉरीतून 25 जण प्रवास करत होते. गुळ्ळापुरजवळील घट्टा परिसरात एक लॉरी उलटली. त्यामुळे 14 जणांचा जागीच मृत्यू झाला. …

Read More »

खानापूर दुर्गानगर येथील श्री साईबाबा मंदिराचा कॉलम भरणी समारंभ २३ रोजी

    खानापूर : दुर्गा नगर खानापूर येथे गुरुवारी (ता. २३) सकाळी दहा वाजता श्री साईबाबा मंदिराचा कॉलम भरणी समारंभ आयोजित करण्यात आला आहे. खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते कॉलम भरणी होणार असून यावेळी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून साईबाबा मंदिर कमिटीचे अध्यक्ष अमृत पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. …

Read More »

कामावरून काढून टाकल्याने चक्क ऑफिसच्या समोरच “काळी जादू”

    बेल्लारी : कामावरून काढून टाकले म्हणून ऑफिसच्या समोरच काही लोकांनी काळी जादू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संस्था तोट्यात असल्यामुळे कामावरून काढून टाकण्यासाठी 50 लोकांना शॉर्टलिस्ट करण्यात आले होते. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा जादू -टोण्याचा प्रकार ऑफीसच्या समोर कोणी केला याबद्दल अद्याप ठोस …

Read More »