Monday , December 8 2025
Breaking News

देश/विदेश

13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांना आवाहन

  नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा मोहिमेच्या बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल, असे म्हणत मोदींनी ट्वीट केले आहे. पहिल्या तिरंग्याचे छायाचित्र शेअर यावर्षी …

Read More »

द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती!

  नवी दिल्ली : देशात सोमवारी पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या असून यूपीए पुरस्कृत उमेदवार यशवंत सिन्हा पराभूत झाले आहेत. या निवडणुकीसाठी ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता. देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० …

Read More »

सोनिया गांधींच्या ईडी चौकशीवरून संसदेत गदारोळ!

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीचे तीव्र पडसाद गुरुवारी संसदेच्या उभय सदनात उमटले. लोकसभेत कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी या मुद्यावरुन गदारोळ केल्यानंतर सरकारच्या वतीने बोलताना संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘सोनिया गांधी महामानव नाहीत’ असा टोला मारला. गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज वारंवार तहकूब झाले. दरम्यान सोनिया यांच्या …

Read More »

रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

  कोलंबो : श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी निवड रानिल विक्रमसिंघे यांची झाली आहे. विक्रमसिंघे 134 मतांनी विजयी झाले आहेत. रानिल विक्रमसिंघे यांच्या रुपात श्रीलंकेला नवे राष्ट्रपती मिळाले आहेत. श्रीलंकेमध्ये आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली आहे. राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार मानले जाणारे साजिथ प्रेमदासा शर्यतीत बाहेर पडल्यानंतर राष्ट्रपतीपदासाठी रानिल विक्रमसिंघे विरुद्ध डलास अलाहाप्पेरुमा …

Read More »

1 ऑगस्टला पुढील सुनावणी, सुप्रीम कोर्टाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

  नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता बदलासंदर्भातील याचिकांवर काही घटनात्मक मुद्यांवर निर्णय आवश्यक आहे. दोन्ही बाजूंनी 29 जुलै पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे स्पष्ट करत याप्रकरणाची पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होईल, असे आज सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले. यामुळे आता राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयात सुरु असणारी पुढील …

Read More »

शिवसेना आमचीच! एकनाथ शिंदे गटाचा निवडणूक आयोगाकडे दावा

  नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी सुरूच आहेत. शिवसेनेत भूतपूर्व बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक चाली रचल्या जात आहेत. लोकसभेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नेमणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिंदे गटाला शिवसेना म्हणून …

Read More »

डाळ, तांदूळ, पीठ, बेसनाच्या खुल्या विक्रीवर जीएसटी नाही : अर्थमंत्री सीतारामण

नवी दिल्ली : केंद्र सरकारने काही खाद्यवस्तूवर वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेतून हटवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला असून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी ट्विट करीत यासंबंधी माहिती दिली. या खाद्य वस्तुंच्या खुल्या विक्रीवर कुठलेही जीएसटी शुल्क आकारले जाणार नाही, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. डाळ, गहू, …

Read More »

उद्धव ठाकरे युतीसाठी तयार होते, पण संजय राऊतांनी खोडा घातला : राहुल शेवाळे यांचा गौप्यस्फोट

  नवी दिल्ली : शिवसेनेच्या १२ खासदारांच्या स्वतंत्र गटाचे गटनेतेपदी खासदार राहुल शेवाळे यांची निवड केली आहे. याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.१९) पत्रकार परिषदेत दिली. तसेच भाजप शिवसेना युती होण्याबाबत जून महिन्यात चर्चा सुरू झाली होती. शिवसेना पक्ष …

Read More »

भावना गवळींचा व्हिप सर्व 18 खासदारांना लागू, आमचा पाठिंबा एनडीएच्या उमेदवारालाच : राहुल शेवाळे

  नवी दिल्ली: भावना गवळी याच पक्षाच्या लोकसभेतील मुख्य प्रतोद असून त्यांचा व्हिप हा सर्व 18 खासदारांना लागू असल्याचं मुख्यमंत्री शिंदे गटाचे गटनेते राहुल शेवाळे यांनी सांगितलं आहे. आम्ही एनडीएचा घटक असून उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड यांनाच पाठिंबा देत आहोत असंही ते म्हणाले. युतीबाबत उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी …

Read More »

थरारक घटना! खाण माफियांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याला चिरडलं; दगडांनी भरलेला ट्रक अंगावर घातल्याने जागीच मृत्यू

  हरियाणा : दगडांचं अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याच्या अंगावर ट्रक घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी दगडाने भरलेला ट्रक संबंधित पोलीस अधिकार्‍याच्या अंगावर घातला. या दुर्दैवी घटनेत पोलीस अधिकार्‍याच्या जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर खाण माफियांनी घटनास्थळावरून पळ काढला असून परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण …

Read More »