Sunday , July 26 2026
Breaking News

देश/विदेश

गोव्यातील काँग्रेसच्या ‘त्‍या’ आठ आमदारांपैकी पाच आमदार चेन्नईला रवाना

पणजी : गोव्यातील ११ काँग्रेस आमदारांपैकी ८ जण फुटण्याची काही दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. त्यावर पडदा पडतो न पडतो तोच आता पुन्हा काँग्रेसचे आमदार फुटण्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने आठ आमदार फुटू नयेत यासाठी आपल्या पाच आमदारांना चेन्नई येथे पाठवले आहे. मार्च २०२२ मध्ये झालेल्या गोवा विधानसभेच्या …

Read More »

उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून जगदीप धनकड यांना उमेदवारी, नड्डा यांनी केली घोषणा

नवी दिल्ली : शनिवारी सायंकाळी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा केली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. दुपारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तसेच …

Read More »

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार मांडणार 24 विधेयक

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारकडून 24 नवीन विधेयक सादर करण्यात येतील, अशी माहिती लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाकडून देण्यात आली. दि. मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीस (सुधारणा), विधेयक, प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष (सुधारणा) विधेयक, केंद्रीय विद्यापीठे (सुधारणा) विधेयक, प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पीरियोडिकल्स विधेयक-2022 सारख्या महत्वाच्या …

Read More »

राष्ट्रपती पदासाठी आपचा यशवंत सिन्हांना पाठिंबा जाहीर

  नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडण्यासाठी सोमवारी (18 जुलै) मतदान होणार आहे. मतदानापूर्वी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सक्रिय झाले आहेत. अधिक पाठिंबा मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत. अशात दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाचा पाठिंबा विरोधी पक्षांना मिळाला आहे. ही विरोधकासाठी आनंदाची बातमी आली. …

Read More »

भारतात मंकीपॉक्सची एन्ट्री!; केरळमध्ये आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण

  नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून मंकीपॉक्स विषाणूचा जगभर धुमाकुळ घातला आहे. आतापर्यंत 20 हून देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा शिरकाव झाला आहे. आता केरळच्या कोल्लममध्ये देशातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला आहे. केरळच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी ही माहिती दिली आहे. भारतात केरळच्या कोल्लम येथे मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे. टीवीएम …

Read More »

गायक दलेर मेहंदीला दोन वर्षांचा तुरुंगवास; मानवी तस्करीसाठी कोर्टाने सुनावली शिक्षा

पटियाला: प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गायकाला पंजाब पोलिसांनी अटक केली असून यामागचे कारण धक्कादायक आहे. दलेरला मानवी तस्करी प्रकरणी अटक झाली आहे. या प्रकरणात त्याची 2 वर्षांची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. अशी माहिती मिळते आहे की दलेरला पटियाला सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात येणार …

Read More »

देशातील 18 वर्षांवरील नागरिकांना 15 जुलैपासून मोफत बूस्टर डोस

नवी दिल्ली : भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 15 जुलैपासून पुढील 75 दिवसांपर्यंत 18 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. कोरोनाची लागण होऊ नये, याकरिता 60 वर्षांवरील लोकांना बूस्टर डोस दिला जात आहे. …

Read More »

राम सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी; 26 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी

  नवी दिल्ली : राम सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करून त्याचे संरक्षण करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर लवकर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवली आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर 26 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. भाजप नेते खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ही याचिका दाखल केली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीए सरकारच्या कार्यकाळात …

Read More »

रियाने अनेकदा गांजा खरेदी करुन सुशांतला दिला : एनसीबी

  मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. एनसीबीने दावा केला आहे की सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड रियाने अनेकवेळा गांजा खरेदी करुन त्याला दिला. काल या प्रकरणातली सुनावणी पार पडली. ३५ आरोपींविरोधात या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होते. सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने …

Read More »

ओबीसी आरक्षणाची सुनावणी लांबणीवर; नव्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण निर्देश

नवी दिल्ली : राज्यातील ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 27 टक्के आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने पुढील निर्णय येईपर्यंत राज्यात नव्याने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करु नये, असे निर्देश दिले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर पुढील सुनावणी आता 19 जुलैला होणार आहे. …

Read More »