Sunday , July 26 2026
Breaking News

देश/विदेश

केरळमध्ये मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळला, 14 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी

  तिरुअनंतपुरम : भारतात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण सापडला असून केरळमधील कन्नूमरमध्ये 31 वर्षाच्या युवकाला त्याची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हा व्यक्ती 13 जुलै रोजी दुबईहून भारतात परतला आहे. केरळमध्ये मंकीपॉक्स आजाराचा दुसरा रुग्ण सापल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या रुग्णाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृत्ती …

Read More »

बाबा महेंद्रनाथ धाम मंदिरात चेंगराचेंगरी; 2 महिलांचा मृत्यू

  सिवान : बिहारमधील सिवान जिल्ह्यातील बाबा महेंद्रनाथ शिव मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिलांचा मृत्यू झाला. सोमवारी झालेल्या अपघातात इतर भाविक जखमी झाले आहेत. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लिलावती देवी (42, रा. हुसैनगंज ब्लॉकच्या प्रतापपूर गाव) व सुहागमती …

Read More »

वृंदा करात यांना क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार जाहीर

  सांगली : येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्यावतीने दिला जाणारा क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार यावर्षी कॉम्रेड वृंदा करात यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती क्रांतिसिंह लोक विद्यापीठाचे संघटक कॉम्रेड सुभाष पाटील आणि सचिव कॉम्रेड सुभाष पवार यांनी दिली आहे. याबाबत कॉम्रेड पाटील म्हणाले, येत्या 6 ऑगष्ट रोजी दुपारी 1.30 …

Read More »

इंदूरहून जळगावकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली; 13 जणांचा मृत्यू

  इंदूर : मध्य प्रदेशातील धारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 12 ते 15 जण बेपत्ता झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघातग्रस्त बसला क्रेनच्या मदतीने …

Read More »

जुलै महिन्याच्या पहिल्या 15 दिवसात पेट्रोल-डिझेलचा खप घसरला

  नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत घट झाली आहे. रविवारी जाहीर झालेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. देशभरात मान्सून सुरू झाला आहे. त्याच्या परिणाम इंधन विक्रीत घट झाली आहे. मान्सून दाखल झाल्यानंतर देशातील काही भागांमध्ये इंधनाचा वापर कमी होतो. त्याशिवाय वाहतूकही कमी …

Read More »

राष्ट्रहितासाठी सभागृहाचा उपयोग करा; नरेंद्र मोदींचं विरोधकांना आवाहन

नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना चर्चा करत राष्ट्रहितासाठी काम करण्याचं आवाहन केलं आहे संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना चर्चा करत राष्ट्रहितासाठी काम करण्याचं आवाहन केलं आहे. “हा कालखंड सध्या फार महत्वाचा आहे. स्वातंत्र्याचा …

Read More »

राष्ट्रपतीसाठी एनडीएला तर उपराष्ट्रपतीसाठी यूपीएला पाठिंबा : संजय राऊत

  मुंबई : राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी (ता. १८) निवडणूक होणार आहे. एनडीएने आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. तर यूपीएने यशवंत सिन्हा यांना उभे केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर शिवसेना मुर्मू आणि सिन्हा यांच्यापैकी कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अनेक घडामोडीनंतर शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना …

Read More »

गोव्यात काँग्रेस ऍक्शन मोडमध्ये, दिगंबर कामत यांची हकालपट्टी

  पणजी : माजी मुख्यमंत्री, माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांची पक्षाच्या कायम स्वरूपी निमंत्रक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका कामत यांच्यावर ठेवण्यात आला आहे. काँग्रेस आमदारांना भाजपमध्ये नेण्यासाठी दबाव आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दिगंबर कामत यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी …

Read More »

पुलवामामध्‍ये पोलीस-सीआरपीएफ पथकावर दहशतवादी हल्‍ला, ‘एएसआय’ शहीद

काश्मीर : दक्षिण काश्‍मीरमधील पुलवामा जिल्‍ह्यात पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्‍या (सीआरपीएफ) संयुक्‍त पथकावर आज (दि. १७) दहशतवादी हल्‍ला झाला. या हल्‍ल्‍यात ‘सीआरपीएफ’चे एएसआय शहीद झाले. या हल्‍ल्‍यानंतर परिसरातील शोध मोहिम तीव्र करण्‍यात आली आहे. पुलवामामधील सर्कुलर रस्‍त्‍यावरील बथुरा क्रासिंगजवळील तैनात असणार्‍या पोलीस व सीआरपीएफ पथकावर दहशतवाद्‍यांनी अंदाधूंद गोळीबार …

Read More »

उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वा

नवी दिल्ली :  विरोधी पक्षांकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. विरोधी पक्षांकडून काँग्रेस नेत्या आणि राजस्थानच्या माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. याची घोषणा शरद पवार यांनी केली. विरोधी पक्षांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. यात शिवसेना खासदार …

Read More »