Sunday , July 26 2026
Breaking News

देश/विदेश

बिल्किस बानो यांना सर्वोच्च न्यायालयाच्या धक्का, सामूहिक अत्याचार करणार्‍यांची सुटका करण्याविरोधातील याचिका फेटाळली

  नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानो यांना मोठा धक्का देत सामूहिक बलात्कार करणार्‍यांच्या सुटकेविरोधातील याचिका फेटाळली आहे. 2002 साली गोध्रा दंगलीवेळी बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता, तसेच त्यांच्या कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या 11 आरोपींची गुजरात सरकारने सुटका केली …

Read More »

महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येण्यापासून रोखलं नाही, मीच त्यांना आमंत्रण देणार

  बसवराज बोम्मई यांची अमित शाह यांना माहिती नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येण्यासाठी बंदी नाही, पण त्यावेळी परिस्थितीचा फायदा घेऊन सीमाभागात गडबड करण्याचा काहींचा डाव असल्याची माहिती आमच्याकडे होती, त्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या मंत्र्यांना रोखलं अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिली आहे. …

Read More »

सीमावादावर चर्चा करण्यासाठी सहा मंत्र्यांची समिती; अमित शाह यांचे दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश

  नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या सर्वोच्च न्यायालयात असून त्या ठिकाणी निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्यांनी कोणताही वाद घालू नये, कोणताही दावा करु नये असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. तसेच दोन्ही राज्यांतील प्रत्येकी तीन-तीन अशा एकूण सहा मंत्र्यांची एक समिती तयार करावी आणि सीमावादावर चर्चा करावी …

Read More »

बिहारमध्ये विषारी दारू पिल्याने २० जणांचा मृत्यू

  पाटणा : बिहारच्या सारण जिल्ह्यात विषारी दारू पिल्याने २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. छपरा येथील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून या घटनेनंतर बिहारमध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली. …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल

  नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सतीष विडोळकर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य मिशन यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील १५० गावांनी इतर राज्यात जाण्याच्या भूमिकेला या याचिकेत विरोध करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विरूद्ध भारत …

Read More »

श्रद्धा वालकर प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

  नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. श्रद्धानं दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र पोलिसांना चिठ्ठी लिहून आफताबची तक्रार केल्याचं काही दिवसांपूर्वी तपासातून समोर आलं होतं. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी याप्रकरणाचा पाठपुरावा का केला नाही? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित …

Read More »

रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली; आरोपी आफताबची कोर्टात कबुली

  नवी दिल्ली : देशाला हादरवणार्‍या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला यानं कोर्टासमोर आपला कबुलीनामा दिला आहे. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचे आफताबनं कोर्टात कबुल केले आहे. दरम्यान, आरोपी आफताबची पोलीस कोठडी आज संपल्यामुळे त्याला दिल्लीतील साकेत कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी आफताबने दिल्लीतील साकेत कोर्टात कबुली …

Read More »

सीमावासियांना काय न्याय देणार? : खासदार संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

  नवी दिल्ली : शिवरायांचा अपमान करणार्‍यांचा जे सरकार बचाव करतंय ते सरकार सीमा बांधवांना काय न्याय देणार असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. बेळगाव सीमा भाग हा केंद्रशासित प्रदेश करावा अशी मागणीही त्यांनी केली. संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्यांवर भाष्य …

Read More »

दहशतवादाविरुद्ध संपूर्ण जगाने एकत्र येण्याची गरज : पंतप्रधान नरेंद्र मोदी

  नवी दिल्ली : दहशतवादाविरुद्ध संपूर्ण जगाने एकत्र येण्याची गरज असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलं आहे. नवी दिल्लीत ‘नो मनी फॉर टेरर’ या विषयावर आयोजित परिषेदत ते बोलत होते. दहशतवादाला होणारा आर्थिक पुरवठा हाच या परिषदेचा मुख्य विषय होता. दहशतवाद आपल्या दारापर्यंत येईपर्यंत आपण वाट पाहू शकत नाही असंही …

Read More »

भाजपच्या पहिल्या यादीत हार्दिक पटेल, रवींद्र जाडेजाच्या पत्नीचे नांव!

  अहमदाबाद : गुजरातमध्ये होणार्‍या आगामी दोन टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिल्या टप्प्यासाठी 160 उमेदवारांची नावे जाहीर केली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल अहमदाबादमधील घाटलोडिया मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले पाटीदार नेते हार्दिक पटेल यांना विरमगाम विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. दुसरीकडे भाजपने जामनगर …

Read More »