Sunday , February 9 2025
Breaking News

एनआयएची केरळमधील पीएफआयशी संबंधित तब्बल 58 ठिकाणांवर छापेमारी

Spread the love

 

तिरुअनंतपुरम : राष्ट्रीय तपास यंत्रणेने आज पहाटे केरळमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) शी संबंधित तब्बल 58 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. एनआयएचे वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार पीएफआयचे नेते अन्य नावावर पीएफआय सुरू करण्याच्या प्रयत्नात होते, त्यासंदर्भात कारवाई करण्यात आली आहे.
अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएची छापेमारी पहाटे साडेचारपासून सुरू आहे. केरळच्या एर्नाकुलममध्ये पीएफआशी संबधित आठ ठिकाणांवर कारवाई करण्यात आली आहे. तिरुअनंतपुरम येथे सहा जागांवर छापेमारी केली आहे. तसेच इतर अनेक ठिकाणांवर एनआयएची छापेमारी सुरू आहे.
पीएफआय ही संघटना कट्टरतावादी विचारांची संघटना समजली होती. केरळ, कर्नाटकमध्ये या संघटनेचे मोठे कार्यक्षेत्र आहे. देशातील 24 राज्यांमध्ये या संघटनेची शाखा आहे. मुस्लिमबहुल भागात जनाधार मिळवण्याचा प्रयत्न या संघटनेकडून सुरू होता. महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर आदी जिल्ह्यांमध्ये त्यांचे काम सुरू होते. पुणे हे पीएफआयचे मुख्य केंद्र असल्याचे म्हटले जाते.

पीएफआयवर पाच वर्षाची बंदी
दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात पाच वर्षांची बंदी घातली आहे. केंद्र सरकारने याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. तपास यंत्रणांच्या शिफारसीवर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांत केंद्रीय तपास यंत्रणांनी पीएफआयवर जोरदार कारवाई सुरू केली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा, ईडी यांच्यासह विविध राज्यातील तपास यंत्रणांनी पीएफआयच्या कार्यालयांवर 22 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर रोजी छापे मारले आहेत. केंद्र सरकारने पीएफआय शिवाय इतर संघटनांवरही बंदी घातली आहे.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या फॅक्टरीत धडाधड स्फोट, मजुरांच्या किंकाळ्या, दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू

Spread the love  नदिया : पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्याच्या कल्याणीमध्ये एका फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *