खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य ॲमेचुअल ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने क्रॉस कंट्री स्पर्धा तुमकुर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये खुला गट १० किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये वैभव मारुती पाटील (बिदरभावी) तालुका खानापूर याने भाग घेऊन तृतीय क्रमांक मिळविला.
वैभव पाटील ३६.५० मिनिटात वरील अंतर पार केले.
यांची अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या स्पर्धा येत्या ८ जानेवारी रोजी राष्ट्रीय स्पर्धा गोहाटी आसाम येथे होत आहेत.
वैभव पाटील हा मराठी शाळा बिदरभावी व महालक्ष्मी हायस्कूल तोपिनकट्टीचा विद्यार्थी असुन सध्या तो बी कॉमच्या व्दितीय वर्षात अमीन कॉलेज बेंगलोर या ठिकाणी शिकत आहे. वैभव हा बेंगलोर येथील कंटिरीवा स्टेडियम बेंगलोर या ठिकाणी धावण्याचा सराव करीत आहे
आज याला अवल श्रीयन असोसिएशन कोच व एल. जी. कोलेकर गर्लगुंजी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. याला सर्व शिक्षक वडील मारुती पाटील यांचे सहकार्य लाभत आहे. त्याच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.