Sunday , February 9 2025
Breaking News

कर्नाटकमध्ये शाळा, कॉलेजमध्ये मास्क बंधनकारक, कोरोना नियमांचेही करावे लागणार पालन!

Spread the love

 

बेळगाव : मागील काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच कारणामुळे भारतातही प्रतिबंधात्मक उपायांद्वारे म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. लसपुरवठा तसेच आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येथे शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. बुधवारी (28 डिसेंबर) याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानुसार शाळा तसेच महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोबतच विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळावेत असेही आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच पब्स, विमातळ, उपहारगृहे या ठिकाणीदेखील मास्क वापरणे तसेच इतर प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे. कलबुर्गी विमानतळ प्रशासनाने याआधीच मास्क वापरणे अनिवार्य असल्याचे आदेश दिलेला आहे.
संभाव्य कोरोना लाटेला तोंड देण्यासाठी काय तयारी असावी यावर चर्चा करण्यासाठी कर्नाटक सरकारने एक बैठक घेतली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरोग्यमंत्री के. सुधाकर होते. सोबतच या बैठकीला महसूलमंत्री आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आर. अशोक हेदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर मास्क वारणे अनिवार्य असल्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाबाबत महसूलमंत्री आर. अशोक यांनी अधिक माहिती दिली आहे. चीनमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. आपल्या सल्लागार कक्षाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करण्याचा सल्ला दिलेला आहे. खबरदारी म्हणून कोरोनाची लक्षणं असलेल्यांवर उपचार करण्यासाठी बंगळुरू येथे दोन समर्पित रुग्णालये असतील, असे अशोक यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

बँक फसवणूक प्रकरण; भाजपचे माजी मंत्री कृष्णय्या शेट्टी यांना तीन वर्षांची शिक्षा

Spread the love  बंगळूर : ७.१७ कोटी रुपये बँक फसवणूक प्रकरणात गुरुवारी एका विशेष न्यायालयाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *