मेक्सिको : पुन्हा एकदा गोळीबारानं जगातील महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका हादरली आहे. उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये एका कारागृहात अज्ञात बंदूकधारकांनी गोळीबार केला आहे. या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 10 सुरक्षारंक्षांसह 4 कैद्यांचा समावेश आहे. वृत्तसंस्था एएफपीच्या म्हणण्यानुसार, रविवारी उत्तर मेक्सिकन शहरातील सिओडाड जुआरेजमधील एका तुरुंगावर अज्ञात बंदुकधारींनी हल्ला केला. ज्यात 14 जण ठार झाले असून 24 कैदी पळून गेले आहेत.
चिहुआहुआ स्टेट प्रॉसिक्यूटरच्या कार्यालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, हल्ल्यादरम्यान अज्ञात बंदुकधारींनी Armored Vehicles चा वापर केला होता. मृतांमध्ये 10 सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. तर चार कैंद्याचाही या गोळीबारात मृत्यू झाला आहे.
मेक्सिकन शहर तुरुंगावर हल्ला
अज्ञात बंदुकधारींनी रविवारी उत्तर मेक्सिकन शहरातील सिओडाड जुआरेझ येथील तुरुंगावर हल्ला केला. ज्यात 14 जण ठार झाले आहेत. तर 24 कैदी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत, असं चिहुआहुआ स्टेट प्रॉसिक्यूटर कार्यालयानं सांगितलं आहे. निवेदनात म्हटलं आहे की, हल्ल्याच्या काही वेळापूर्वी बुलेव्हार्डजवळ सशस्त्र लोकांनी महापालिका पोलिसांवरही गोळीबार केला होता. त्यानंतर हल्लेखोरांनी तुरुंगाबाहेरील सुरक्षा दलाच्या सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला.
गोळीबारानंतर गोंधळ
स्थानिक माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नववर्षानिमित्त काही कैद्यांचे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी कॅम्पसबाहेर थांबले होते. गोळीबाराच्या घटनेनंतर कारागृह आणि आसपासच्या परिसरात गोंधळाचं वातावरण पाहायलाल मिळालं. तुरुंगात काही कैद्यांनी अनेक वस्तूंना आग लावली आणि कारागृहाच्या सुरक्षा रक्षकांशी झटापट केली, असं स्थानिक माध्यमांनी सांगितलं आहे. दरम्यान, गोळीबाराच्या घटनेनंतर चार कैद्यांचा मृत्यू झाला, तर गोंधळाचा फायदा घेत 24 कैद्यांनी कारागृहातून पळ काढला. सध्या या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू असून पळून गेलेल्या कैंद्याचाही शोध सुरू आहे.