बेळगाव : सोमवार दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारी ठीक दोन वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हरब्रिज) येथे प्रस्तावित बेळगाव तालुक्यात होणाऱ्या रिंग रोड रद्दकरण्यासंदर्भात पुढील वाटचालीसाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, सर्व शेतकऱ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व युवा आघाडीचे चिटणीस मनोहर संताजी यांनी केले आहे.