निपाणी (वार्ता) : गळतगा येथील अमन एज्यूकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसाईटीच्या सनशाईन नर्सींग कॉलेजतर्फे आरोग्य तपासणी शिबीर आणि कोरोनाबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. अरमान जुगल यानी डेंगु व चिकनगुनिया या आजाराबद्दल माहिती दिली. त्यासाठी संस्थेचे नुरमहंमद पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका समीना पठाण, सन्मती कुंभार, प्राचार्य एम. बी. जाधव, आतिफ मकानदार, सुहेल मुल्ला, इस्मान सन्नकी, रंजीता पाटील सानिया नाईकवाडे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. हिना जमादार यांनी आभार मानले.
