निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष व व कॅबिनेट मंत्री राजेश क्षीरसागर यांनी निपाणीस धावती भेट दिली. त्यावेळी मराठी भाषिक नागरिकांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी भाषकांची होणारी गळचेपी, शैक्षणिक क्षेत्रावर होणारा अन्याय, कर्नाटक पोलिसांची दंडूकशाही या विषयावर सविस्तर चर्चा केली. तसेच सीमाभागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात शिक्षणासाठी राखीव कोटा देण्याची मागणी केली.
यावेळी नवनाथ चव्हाण, प्रशांत नाईक, विश्वास पाटील, जयराम मिरजकर, दीपक वळीवडे, अरुण आवळेकर, उत्तम कमते, रुपेश तोडकर, शिवम जासूद, अक्षय दबडे, विजय कमते, दादासाहेब मगदूम, युवराज गाडीवडर, उत्तम खाडे, अविनाश दबडे यांच्यासह मराठी भाषेत उपस्थित होते.