मान्यवरांची उपस्थिती : दाक्षिणात्य पद्धतीचा नाश्ता
निपाणी (वार्ता) : येथील निपाणी बस स्थानकासमोर जासूद कॉम्प्लेक्समध्ये बागलकोट येथील हॉटेल व्यवसायिक श्रीशांत कुमार यांनी दाक्षिण्यात पद्धतीचे पदार्थ मिळण्याचे ‘हॉटेल पेट पूजा’ नावाने नवीन हॉटेल सुरू केले. त्याचे उद्घाटन निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी त्यांच्या समवेत निपाणीचे माजी नगराध्यक्ष विजय शेटके, चंद्रकांत जासूद, राजेंद्र चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष मुन्ना काझी, माजी सभापती अल्लाबक्ष बागवान, प्रा. राजन चिकोडे, विश्वास पाटील, किरण कोकरे, नितीन साळुंखे, माजी नगरसेवक परशराम भोईटे, सुभाष कांबळे, धनाजी निर्मळे, मुकुंद रावण, बबन चौगुले, संदीप चावरेकर, उद्योजक प्रशांत नाईक, सामाजिक कार्यकर्ते आस्लमभाई शिकलगार, महेश पाटील, शांतेश, सुधीर, संगाप्पा, अक्षय, विरुपक्षप्पा, श्रीधर, सुनील लाटकर, शशिकांत चडचाळे, सुनील हिरुकुडे, दादू खोत, संजय सूर्यवंशी, चंद्रकांत सुरवसे, जुबेर आस्लम बागवान, शब्बीर माणगावकर कार्यकर्ते उपस्थित होते.