Sunday , February 9 2025
Breaking News

पुन्हा राज्यात काँग्रेसची सत्ता येणार

Spread the love
माजी मंत्री वीरकुमार पाटील : गायकवाडी, कोडणी येथे बैठक
निपाणी (वार्ता) : भाजपाच्या अहंकारी वृत्तीला सर्वसामान्य जनता कंटाळली आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सर्वसामान्य जनतेची पिळवणूक केली जात आहे. गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसने देश जोडण्याचे काम  केले आहे.  पक्षाने सर्व सामान्य जनतेच्या हिताची कामे केली. आजच्या युवा पिढीला  ही कामे माहीत नाहीत. आपण सर्वांनी मिळून युवकांपर्यंत ही कामे पोहचवली पाहिजेत, कोणत्याही अफवेला बळी पडू नका. निपाणीमधून काकासाहेब पाटील यांचीच उमेदवारी पक्षाने ठरवले असून पुन्हा काँग्रेसचे सरकार येणार असल्याचे मत माजी मंत्री पाटील यांनी व्यक्त केले. गायकवाडी, कोडणी परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, कोडणी गावच्या विकासासाठी आपण कायमच प्रयत्न केले आहेत. विरोधक जाहिरात बाजी करून १८०० कोटींची कामे केल्याचे सांगतात. पण सत्यात ती कामे कोठेच दिसत नाहीत. लोकआग्रहास्तव कोडणी-चिखली रोडवरील फुल १ कोटी ७० लाख रुपये खर्च करून बांधण्यात आला. त्यावेळी आपण त्याच उदघाटन केले नाही. यावेळेची लढाई आपण लोकआग्रहास्तव सर्व ताकदिने लढणार आहे.
यावेळी अशोक पाटील, अन्वर हुक्केरी, मलगोंडा खोत, देवदत्त देशपांडे, श्रीकांत पाटील, मधुकर पाटील, वैभव पाटील, बाबासो खोत, युवराज पठाडे, पुंडलीक पाटील, विनय पाटील, दिगंबर खवरे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आप्पाचीवाडीत मंगळवारी मोफत सीईटी फॉर्म

Spread the love  निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, कुरली, हदनाळ, भाटनांगनूर, सुळगाव, मतिवडेसह निपाणी तालुक्यातील बारावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *