Sunday , July 26 2026
Breaking News

देश/विदेश

धजद भाजपप्रणित एनडीए आघाडीत अधिकृतपणे सामील

  जागा वाटपात गोंधळ नसल्याचे कुमारस्वामींचे मत बंगळूर : आगामी लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्ष आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाची युती अखेर शुक्रवारी निश्चित झाली. धर्म निरपेक्ष जनतादल (धजद) पक्ष अधिकृतपणे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीत सामील झाला. बैठकीनंतर बोलताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले, “धजदने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग …

Read More »

ऐतिहासिक! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक 454 मतांनी मंजूर, विरोधात फक्त दोनच मते

  नवी दिल्ली : लोकसभेत महिला आरक्षणाच्या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर हे विधेयक मंजूर झाले आहे. विधेयकाच्या बाजूने 454 तर विरोधात फक्त दोन सदस्यांनी मतदान केले. महिला आरक्षण विधेयक हे घटनादुरुस्ती विधेयक आहे. महिला आरक्षण विधेयक आता राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे. राज्यसभेच्या मंजुरीनंतर महिला आरक्षण विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. …

Read More »

कॅनडाच्या वक्तव्यावर भारत संतप्त, कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी, 5 दिवसांत देश सोडण्याचे आदेश

  नवी दिल्ली : कॅनडानं भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला आणि एका उच्च भारतीय राजदुताला देश सोडण्याचे आदेश दिले. कॅनडाचं कृत्य गांभीर्यानं घेत भारतानंही जशास तसं उत्तर दिलं आहे. कॅनडाच्या राजदुताला देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करून यासंदर्भात माहिती देण्यात आली …

Read More »

अनंतनाग एन्काऊंटरमध्ये भारतीय सैन्याला मोठं यश; दहशतवाद्यांचा मास्टरमाईंड उझैर खानचा खात्मा

  जम्मू : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत भारतीय सैन्याला मोठं यश आलं आहे. सुरक्षा दलाने लश्कर-ए-तोएबाचा दहशतवादी उझैर खान याला ठार केलं आहे. काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार यांनी सांगितलं की, अनंतनागमध्ये दहशतवादी उझैर मारला गेला. एका मृतदेहाचा शोध सुरू असून तो दहशतवाद्याचा असू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त …

Read More »

तामिळनाडूला पुन्हा पाणी सोडण्याचे कर्नाटकाला आदेश

  रोज पाच हजार क्युसेक पाणी सोडण्याची प्राधिकरणाची सूचना बंगळूर : कावेरी नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबत कावेरी नदी जलव्यवस्थापन प्राधिकरणाने कर्नाटकला पुन्हा दणका दिला असून तामिळनाडूला पुन्हा पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने सोमवारी कर्नाटकला तामिळनाडूला दररोज ५,००० क्युसेक पाणी सोडण्याचे आदेश दिले. कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने १५ …

Read More »

महिला आरक्षण विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी; आज नव्या संसदेत सादर होण्याची शक्यता

  नवी दिल्ली : मोदी मंत्रिमंडळानं सोमवारी (18 सप्टेंबर) संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली असून सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33 टक्के महिला आरक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. महिला आरक्षण विधेयक 19 सप्टेंबरला म्हणजेच, मंगळवारी नव्या …

Read More »

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर, तीन आठवड्यांनी होणार सुनावणी

  नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षांचा नवा अध्याय सुरू झाला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकेवर सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या शिवसेना पक्ष, चिन्हाच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली आहे. तीन आठवड्यांनी शिवसेना पक्ष, चिन्हाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधातील याचिकेवर आज सु्प्रीम कोर्टात कोणतेही कामकाज झाले नाही. यावर तीन …

Read More »

शिवसेना नाव व चिन्हाबाबत याचिकेवर आज सुनावणी

  नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी (दि. 18) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. ठाकरे गटाने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा, याबाबत दाखल केलेल्या याचिकेवरही सुनावणी होणार आहे. सत्तासंघर्षाच्या निकालात आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च …

Read More »

महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये पावसाच्या जोरदार हजेरीची शक्यता

  नवी दिल्ली : पुढील दोन आठवड्यांत देशभरात दमदार पावसाच्या हजेरीची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यामध्ये हवामान खात्याने महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये आज सकाळी मुसळधार पाऊस झाला. मात्र दुपारनंतर पुन्हा हवामानात बदल दिसून आला. दिवसभर दमट आणि …

Read More »

राजस्थानमध्ये बस आणि ट्रेलरचा भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू तर 12 जखमी

  भरतपूर : राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात आज पहाटे साडे चार वाजता बस आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला. यामध्ये 11 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 12 जण जखमी आहेत. डिझेल संपल्यामुळे बस एका उड्डाणपुलावर उभी होती. काही प्रवासी आणि बसचा चालक बसच्या मागच्या बाजूला येऊन थांबले होते. तेवढ्यात मागून भरधाव ट्रेलर …

Read More »