Sunday , July 26 2026
Breaking News

देश/विदेश

नेपाळमध्ये भूकंपाचा धक्का, ६ जणांचा मृत्यू; दिल्लीमध्ये हादरे

  नवी दिल्ली : नेपाळमध्ये बुधवारी पहाटे भूकंपाचा धक्का बसला असून यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. येथील डोटी जिल्ह्यात काही घरेदेखील पडली आहेत. ६.३ रिश्टर स्केलच्या या भूकंपाचे हादरे राजधानी दिल्ली परिक्षेत्रातही बसले आहेत. नेपाळमधील डोटी जिल्ह्यामध्ये पहाटेच भूकंप झाल्याची घटना घडली. या भूकंपात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला …

Read More »

टांझानियात ४३ जणांना घेऊन जाणारे विमान तलावात कोसळले

  टांझानियातील व्हिक्टोरिया तलावात एक प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे विमान ४३ जणांना घेऊन जात होतं. पण खराब हवामानामुळे हे प्रवासी विमान तलावात कोसळलं आहे. या घटनेची माहिती मिळातच पोलीस दल आणि बचाव दलाची पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत. विमानातील प्रवाशांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात …

Read More »

तिरुपती संस्थानने प्रथमच जाहीर केली संपत्ती; एकूण मालमत्ता 2.26 लाख कोटी

  तिरुमला तिरुपती देवस्थानने प्रथमच मंदिराची एकूण संपत्ती जाहीर केली आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, शनिवारी मंदिराच्या वतीने श्र्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये मंदिराच्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये 5,300 कोटी रुपयांचे 10.3 टन सोने आणि 15,938 कोटी रोख जमा असल्याचे सांगण्यात आले आहे. मंदिराची एकूण मालमत्ता 2.26 लाख कोटी आहे. 2019 पासून सोने …

Read More »

मध्य प्रदेशमधील भीषण अपघातात महाराष्ट्रातील ११ कामगार ठार

  भोपाळ : मध्य प्रदेशात बसने वाहनाला दिलेल्या धडकेत ११ कामगारांचा मृत्यू झाला आहे. बेतूल येथे गुरुवारी रात्री हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे सर्व ११ कामगार महाराष्ट्रातील होते. बसने दिलेल्या धडकेनंतर कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. पोलिसांना पत्रा कापून काही मृतदेह बाहेर काढावे लागले. एका जखमीला उपचारासाठी …

Read More »

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला

  इस्लमाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात इम्रान हे जखमी झाले असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना सध्या रुग्णालयाता दाखल करण्यात आले आहे. हा गोळीबार कुणी केला, हल्लेखोर कोण होते, याबाबत अद्याप …

Read More »

गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, 2 टप्प्यात मतदान, 8 डिसेंबरला मतमोजणी

  नवी दिल्ली : गुजरातच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यावेळची लढत केवळ भाजपा आणि काँग्रेसमध्ये होणार नाहीये, तर दिल्ली आणि पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या आपनेही गुजरातच्या आखाड्यात उडी घेतलीय. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘होम ग्राऊंड’वर यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच केंद्रीय …

Read More »

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीचे समन्स

  नवी दिल्ली : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) साहिबगंज जिल्ह्यातील अवैध खाणकाम प्रकरणात समन्स बजावला आहे. मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी गुरुवारी तपास अधिकार्‍यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे सहकारी पंकज मिश्रा यांच्याविरोधातील तपासादरम्यान काही तथ्ये समोर आली असून, त्यांची पडताळणी करणे आवश्यक आहे, असे ईडीच्या एका अधिकार्‍याने …

Read More »

गुजरातमध्ये पूल कोसळला, 400 जण नदीत पडले, अनेकजण बुडाल्याची भीती

  अहमदाबाद : गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या पूलावर असणारे लोक नदीत पडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अद्याप कोणतीही जिवितहानी झाल्याचं वृत्त नाही. काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, केबल पूल कोसळल्यामुळे चारशे लोक नदीत बुडाले आहेत. मच्छू नदीत कोसळलेला पूल पाच दिवसांपूर्वीच दुरुस्त …

Read More »

सोमालिया दहशतवादी हल्ल्याने हादरले; 100 जण दगावले

  सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये झालेल्या दोन कार बॉम्बस्फोटात किमान 100 जण ठार झाले आहेत. सोमालियातील शिक्षण मंत्रालयाबाहेर ही घटना घडली. सोमालियाचे अध्यक्ष हसन शेख यांनी एका निवेदनात या वृत्ताला दुजोरा दिला असून या घटनेत आतापर्यंत 300 लोक जखमी झाले आहेत. सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये शनिवारी, 29 ऑक्टोबर रोजी दोन कार बॉम्बस्फोट …

Read More »

छठ पूजेदरम्यान भीषण घटना, 30 हून अधिक जळाले, अनेकांची प्रकृती चिंताजनक

  पटना : बिहारच्या औरंगाबादमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घरातील सिलेंडर फुटल्याने मोठा स्फोट झाला. दरम्यान या झालेल्या सिलिंडरच्या स्फोटामुळे 30 हून अधिक जण जळाल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहागंज परिसरातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये आज पहाटे अडीचच्या सुमारास परिसरातील अनिल …

Read More »