Sunday , December 7 2025
Breaking News

देश/विदेश

संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे निधन

नवी दिल्ली : संतूर या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे जगद्विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे निधन झाले आहे. आज 10 मे रोजी त्यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराने आज सकाळी त्यांचे निधन झाले. पंडित शिवकुमार हे 84 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा …

Read More »

तेलंगणा येथे भीषण अपघातात 9 ठार, 17 गंभीर जखमी

तेलंगणा : तेलंगणा राज्यातील कामारेड्डी जिल्ह्यात ट्रक आणि पिकअपमध्ये भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 9 जण जागीच ठार झाले असून, 17 जण गंभीर जखमी आहे. जखमींना बांसवाडा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिटलम तालुक्यातील चियालर्गी गावातील ग्रामस्थ नातेवाईकांच्या दहाव्याच्या कार्यक्रमासाठी केले होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर परताना पिकअपने भरधाव ट्रकला …

Read More »

घरगुती गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महागला, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा एकदा महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. 14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे आजपासून घरगुती सिलिंडरची किंमत 999.50 रुपये असणार आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच जनता हैराण असतानाच सिलिंडरच्या दरात ही वाढ झाली …

Read More »

पटियालामध्ये हाय अलर्ट, इंटरनेट सेवा बंद

पंजाब : पंजाबमधील पटियाला येथे शुक्रवारी दुपारी मिरवणुकीवरून दोन समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला. यानंतर राज्यातील पोलिस दल अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. शहरात सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, आज काही हिंदुत्त्ववादी संघटनांनी हिंसाचाराच्या निषेध …

Read More »

इंधन दरवाढीवरुन सुनावणार्‍या पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री ठाकरेंचं चोख उत्तर!

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविडविषयक घेतलेल्या बैठकीत पेट्रोल-डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारनं व्हॅट कमी न केल्यानंच महाराष्ट्रातील जनतेला त्रास सहन करावा लागत आहे, असा सूचक आरोप केला होता. दरम्यान, पंतप्रधानांच्या या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चोख उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे …

Read More »

बैठक कोरोनाची, पण मोदींची टीका महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालवर!

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या दरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, पश्चिम बंगालला आवाहन करताना इंधनावरील व्हॅट कमी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. लोकांच्या हितासाठी इंधनावरील व्हॅट कमी करा, असे त्यांनी म्हटले आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर पंतप्रधान मोदी यांनी आज (दि. 27) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी त्यांनी …

Read More »

रथ ओढताना विजेचा धक्का; १० भाविकांचा मृत्यू, १५ जखमी

चेन्नई : तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील कालिमेडू शहरात उत्सवादरम्यान भाविकांना विजेचा धक्का बसला. तसेच १५ जण गंभीर जखमी झाले. भाविक मंदिराच्या रथाला ओढत असताना विजेची तार अडकली. यामध्ये दोन लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू झाला. तमिळनाडूच्या तंजावार जिल्ह्यात भगवान अय्यपाचा उत्सव म्हणजे ९४ वा अप्पर गुरुपूजा उत्सव २६ एप्रिलला मंगळवारी रात्री …

Read More »

जम्मूमध्ये भीषण चकमक; 4 दहशतवादी ठार, तर 1 जवान शहीद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या एक दिवस अगोदरच जम्मूमध्ये सुरक्षा आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू आहे. संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले की, गोळीबारामध्ये एक सुरक्षा अधिकारी शहीद झाले आहेत. तर, 4 अधिकारी जखमी झालेली आहेत. तर या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मूमधील चढ्ढा कँप परिसरात शुक्रवारी सकाळी …

Read More »

पंजाबमध्ये आगीत होरपळून एकाच कुटुंबातील 5 मुलांसह सात सदस्यांचा मृत्यू

लुधियाना : मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास झोपडीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये पाच मुलांचा समावेश आहे. घटनेत मृत्युमुखी पडलेले कुटुंब बिहारमधील समस्तीपूप जिल्ह्यातील बोगापूर गावातील असल्याचे पोलीस उपनिरीक्षक बलदेव राज यांनी सांगितले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सुरेश (54), …

Read More »

महाराष्ट्रासह चार राज्यांमधील पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील लोकसभेची एक आणि महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रसने तर महाराष्ट्र, छत्तीसगड काँग्रेसने तर बिहारमध्ये आरजेडीने बाजी मारली आहे. या निवडणूक निकालाकडे देशाचे लक्ष वेधले होते. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची बाजी पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून तृणमूल …

Read More »