Sunday , July 26 2026
Breaking News

देश/विदेश

भाजपचं मिशन ‘राष्ट्रपती’, जेपी नड्डा आणि राजनाथ सिंह यांच्यावर मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. भाजपनेही जोरदार तयारी सुरु केली आहे. राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडण्यासाठी भाजप एनडीएमधील मित्रपक्षांसोबत चर्चा करणार असल्याचं वृत्त आहे. त्याशिवाय यूपीएच्या मित्रापक्षांसोबत आणि अपक्षांसोबतही भाजप चर्चा करणार आहे. या चर्चेची जबाबदारी भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण …

Read More »

राष्‍ट्रपती निवडणूक : संयुक्‍त उमेदवार देण्‍याबाबत सोनिया गांधी सकारात्‍मक

नवी दिल्‍ली : राष्‍ट्रपती पदाच्‍या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्‍यानंतर विरोधी पक्षांच्‍या हालचाली गतीमान झाल्‍या आहेत. काँग्रेस अध्‍यक्षा सोनिया गांधी यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार आणि पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांच्‍याबरोबर चर्चा केली. यानंतर त्‍यांनी एक निवेदन प्रसिद्‍ध करत या निवडणुकीसाठीची पक्षाची भूमिका स्‍पष्‍ट केली. सोनिया गांधी यांनी म्‍हटलं …

Read More »

राष्ट्रपती निवडणुकीआधी विरोधकांत फूट? ममता बॅनर्जींच्या बैठकीवर इतर पक्ष नाराज असल्याची चर्चा

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपविरोधात उमेदवार निश्चित करण्यासाठी विरोधकांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना सुरुंग लागला असल्याची चर्चा सुरू आहे. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्व भाजपविरोधकांची 15 जून रोजी बैठक बोलावली आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांनी बोलावलेली ही बैठक एकतर्फी असल्याचे इतर पक्षांनी म्हटले. विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे …

Read More »

केंद्रीय कर्मचार्‍यांना सरकारचा मोठा दिलासा, महागाईत भत्त्यात वाढ

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. ही वाढ एक जुलैपासून लागू होणार असल्याची माहिती आहे. केंद्र सरकार महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ करणार आहे. काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे. पाच …

Read More »

आज राज्यसभा निवडणूक; मतबेगमीसाठी सगळ्यांची धावाधाव

मुंबई : आमदारांवरील नजरकैद, मतगणितांच्या बेरजा-वजाबाक्या, आरोप-प्रत्यारोपांची राळ आणि विजयाच्या दाव्या-प्रतिदाव्यांनंतर आज, शुक्रवारी राज्यसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीवर महाविकास आघाडीचा वरचष्मा असल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसत आहे. अर्थात गणिती आकड्यांचे राजकीय अन्वयार्थ हे नेहमीच अपेक्षापेक्षा वेगळे असल्यामुळे संध्याकाळी हाती येणाऱ्या निकालांबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे. माजी मंत्री अनिल देशमुख …

Read More »

खूषखबर… मान्सून दोन दिवसांत महाराष्ट्रात

पुणे : तमाम महाराष्ट्रवासियांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. राज्याच्या सीमेवर गेला सुमारे आठवडाभर रुसून थबकलेला मान्सून येत्या दोन दिवसांत दक्षिण महाराष्ट्रात म्हणजे कोकणात दाखल होणार आहे; तसेच येत्या पाच दिवसांत राज्याच्या बहुतांश भागांतही पावसाच्या सरी बरसणार असून, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनच्या पारंपरिक वेळापत्रकानुसार तो …

Read More »

देशाच्या जैव-अर्थव्यवस्थेत आठ वर्षात आठपटीने वाढ

नवी दिल्ली : देशाच्या जैव-अर्थव्यवस्थेत मागील आठ वर्षांच्या कालावधीत आठपटीने वाढ झाली असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘बायोटेक स्टार्टअप एक्स्पो’ चे उद्घाटन करताना केले. दोन दिवस चालणाऱ्या या एक्स्पोमध्ये देशभरातील बायोटेक स्टार्टअप्सनी सहभाग घेतलेला आहे. देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी सर्व क्षेत्रांना मजबूत करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. आधीच्या …

Read More »

राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान पार पडणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली आहे. केंद्रीय निवडणूक …

Read More »

राष्ट्रपतीपदाची निवडणूक आज जाहीर होणार; आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाची निवडणूक आज जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. आज दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर …

Read More »

‘टीआरएस’ला शह देण्यासाठी भाजपकडून हैदराबादमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे आयोजन

नवी दिल्‍ली : तेलंगणचे मुख्यमंत्री आणि टीआरएस नेते के. चंद्रशेखर राव यांनी मागील काही काळापासून भाजपवर सडकून टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता भाजपने टीआरएसला शह देण्‍यासाठी नियोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून 2 आणि 3 जुलै रोजी हैदराबादमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे आयोजन केले आहे. राज्‍यात पुढील वर्षी …

Read More »