नवी दिल्ली : अग्निवीर योजनेबाबत देशभरात सुरू असलेल्या गदारोळात सरकार विविध घोषणा करून हा संपूर्ण वाद संपवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारकडून या योजनेबाबत अनेक घोषणा केल्या जात आहेत. गृह मंत्रालयाच्या अग्निशमन दलाच्या भरतीमध्ये आरक्षण जाहीर केल्यानंतर आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही काही घोषणा केल्या आहेत. ज्यामध्ये अग्निवीरांना स्वस्त …
Read More »अखंड हिंदु राष्ट्राचे कार्य आता कोणीही रोखू शकत नाही!
पणजी : सध्या कालप्रवाह हिंदूंसाठी अनुकूल आहे. अगदी 10 वर्षांपूर्वी हिंदु राष्ट्राचे पहिले अधिवेशन आयोजित केल्यावर सर्वजण साशंक दृष्टीने ‘हिंदु राष्ट्र’ शब्दप्रयोगाकडे पहात होते. आज मात्र 10 वर्षांनी संसदेत असो कि जनसंसदेत असो, ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द प्रचलित झाला आहे. पुरीच्या शंकराचार्यांचा ‘हिंदु राष्ट्रसंघ’, काशी विद्वत परिषदेची ‘संस्कृती संसद’ ते …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या नावाचे बनावट व्हॉटसप खाते; राजकीय व्यक्तींसोबत नागरिकांना मेसेज पाठवल्याने खळबळ
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याच्या नावाने बनावट व्हॉटसप खाते उघल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सय्यद एजाज (वय 42) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे. सय्यदने सावंत यांच्या नावाने बनावट व्हॉटसप खाते उघडले आणि काही राजकीय व्यक्तींसोबत नागरीकांना मेसेज केला होता. …
Read More »केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) मोठी वाढ होऊ शकते. महागाई भत्ता 4 टक्क्यांवरून 5 टक्के केला जाण्याची शक्यता आहे. 1 जुलै 2022 पासून या वर्षाच्या महागाई भत्त्याच्या दुसऱ्या टप्प्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली जाईल असा अंदाज या आधी वर्तवण्यात …
Read More »राष्ट्रपती निवडणूक: तयारीची धुरा आता शरद पवारांकडे; लवकरच होणार विरोधकांची बैठक
नवी दिल्ली : राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोपर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विरोधीपक्षांची राष्ट्रपती निवडणुकीवर चर्चा होणार आहे. त्यासाठी दिवस आणि वेळही निश्चित करण्यात आली आहे. या बैठकीला 17 विरोधीपक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. खुद्द शरद पवारांनाच विरोधीपक्षांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार होण्याची विनंती केली होती. पण त्यांनी आपल्याला अजूनही …
Read More »अग्निपथच्या विरोधाचं लोण दक्षिणेत, सिकंदराबादमध्ये रेल्वे पेटवली, गोळीबारात एकाचा मृत्यू
सिकंदराबाद : केंद्र सरकारनं सैन्य दलातील भरतीसाठी सुरु केलेल्या अग्निपथ योजनेला उत्तर भारतातील राज्यातील युवकांनी विरोध केला. बिहार, उत्तर प्रदेशमध्ये सुरु झालेल्या आंदोलनाचं लोण दक्षिण भारतात पोहोचलं आहे. तेलंगाणामध्ये सिकंदराबादमध्ये रेल्वे स्टेशनवर हिंसक आंदोलन केलं आहे. आज सिकंदराबादमध्ये शेकडो तरुणांनी एकत्र येत रेल्वे गाड्यांचं आणि स्टेशनवरील दुकानांचं नुकसान केलं. सिकंदराबादमध्ये …
Read More »संवैधानिक मार्गाने हिंदु राष्ट्र स्थापन करणार! : हिंदुत्वनिष्ठ संघटना
पणजी : संवैधानिक आणि संसदीय मार्गाने हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकते यावर दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त भरवण्यात आलेल्या ‘हिंदु राष्ट्र संसदे’त सर्व हिंदू संघटनांचे एकमत झाले. त्यातून चांगले कायदेशीर प्रस्ताव तयार झाले आहेत. ते आम्ही केंद्र सरकारला देणार आहोत. त्यासह नेपाळलाही पुन्हा एकदा हिंदु राष्ट्र करण्यासाठी अधिवेशनातील हिंदुत्वनिष्ठ …
Read More »‘मला सोमवारपर्यंत वेळ द्या’, राहुल गांधींची ईडीला विनंती
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीने सलग तीन दिवस चौकशी केली आहे. तीन दिवसांत 30 तासांच्या चौकशीनंतर राहुलने आता ईडीकडून पुढील चौकशीसाठी सोमवारपर्यंत वेळ मागितला आहे. त्यांनी ईडीकडे एक दिवसाचा दिलासा मागितला आणि पुढील चौकशीसाठी सोमवारची वेळ द्यावी, असे सांगितले. असं असलं तरी ईडी …
Read More »देशात पेट्रोल-डिझेलचे मुबलक उत्पादन!
इंधन मागणीच्या वाढीनंतर पेट्रोलियम मंत्रालयाची स्पष्टोक्ती नवी दिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. जून-2021 च्या पंधरवड्याच्या तुलनेत आता मागणीत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेषत: राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये ही वाढ नोंदवण्यात आली. ही वाढती मागणी पुर्ण करण्यासाठी पेट्रोल-डिझेलचे उत्पादन पुरेसे आहे, असे केंद्रीय …
Read More »’अग्निपथ’ योजनेवरून आंदोलनाचा वणवा पेटला; बिहारमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, ट्रेनची जाळपोळ
पटणा : लष्करी सेवेसाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या अग्निपथ योजनेला मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाला आहे. बुधवारी बिहारमध्ये या योजनेविरोधातील आंदोलनाची ठिणगी पडली होती. त्यानंतर आज अनेक जिल्ह्यात आंदोलनाचा वणवा पेटला आहे. आज हरयाणातील गुरुग्राममध्येही आंदोलन झाले. आंदोलक विद्यार्थी-युवकांनी गुरुग्राममध्ये दिल्ली-जयपूर महामार्गावर रास्ता रोको केले आहे. तर, बिहारमधील आंदोलनाला हिंसक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta