अहमदाबाद : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले गुजरातमधील पाटीदार नेते हार्दिक पटेल यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. २ जून रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. काही दिवसांपूर्वीच हार्दिक पटेल यांनी गुजरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सोपवला होता. गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला हा मोठा …
Read More »दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक
नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सत्येंद्र जैन यांची काही दिवसांपूर्वी ४ कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ही अटक करण्यात आली असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे. सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजपचे नेते …
Read More »बंगळुरूमध्ये शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यावर शाईफेक; कार्यक्रमात गोंधळ
बेंगळुरू : भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांच्यावर आज शाईफेक करण्यात आली. बेंगळुरूमधील पत्रकार परिषदे दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी शाईफेक करणार्याला ताब्यात घेतले आहे. या शाईफेकीमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. शाईफेक करणार्यांना टिकेत यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असल्याचे वृत्त आहे. गांधी भवनमध्ये शेतकरी नेते राकेश टिकेत आणि युद्धवीर …
Read More »कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना दरमहा 4 हजार रुपये, 5 लाखांपर्यंत मोफत उपचार
नवी दिल्ली : कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारने ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’ योजनेची सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी या योजनेची कार्यवाही आज करण्यात आली. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी अनाथ मुलांच्या बँक खात्यात पीएम केअर्स फंडातून मदतनिधी पाठविला. कोरोनामुळे ज्या मुलांनी पालक गमावले आहेत, जी …
Read More »…आता हनुमान जन्मस्थळाबाबत नवा दावा
गेल्या चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या हनुमान जन्मस्थळाबाबत नवा दावा साधु महंतांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव हे किष्किंधा नगरी असल्याचा दावा येथील नागरिकांनी केला आहे. एवढेच नाही तर शासन दप्तरी, जिल्हा नियोजन समितीवर ही परिसराची किष्किंधा नगरी अशीच नोंद असल्याची माहिती येथील जाणकारांनी दिली आहे. ज्ञानवापी नंतर …
Read More »पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या
पटियाला : काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची मानसा जिल्ह्यात अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. पंजाब सरकारने एक दिवस आधीच सुरक्षा काढून घेतली होती. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यू झाल्याची घोषणा केली. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबचे …
Read More »कर्नाटकहून अयोध्येला जाणाऱ्या मिनी बसचा भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत 7 ठार
नानपारा : लखीमपूर महामार्गावर नैनिहाजवळ रविवारी पहाटे एका वेगवान ट्रक आणि ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. नऊ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मोतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील …
Read More »बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना ४ वर्षांची शिक्षा
नवी दिल्ली : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना ४ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा आज (दि.२७) ठोठावली. विशेष म्हणजे चौटाला यांनी आजारी असल्याने आणि प्रकरण जुने असल्याने सहानुभूती मागितली होती. दरम्यान, न्यायालयाने ओमप्रकाश चौटाला यांना तीन वर्षांपेक्षा जास्त काळ …
Read More »जम्मू-काश्मीर : २४ तासांत ६ दहशतवाद्यांचा खात्मा
कुपवाडा (जम्मू-काश्मीर) : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न सुरूच आहेत. याच दरम्यान गुरूवारी (दि. २६) रोजी सकाळी कुपवाडा जिल्ह्यात घुसखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश आले. यामुळे गेल्या २४ तासात सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश मिळाले आहे. दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि मोठा दारूगोळ्या, इतर …
Read More »हृदयद्रावक! सेनेगल हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत 11 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू
आफ्रिकेच्या सेनेगलमधील हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत 11 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडलीय. या दुर्दैवी घटनेनंतर सेनेगलचे अध्यक्ष मॅकी सॅल यांनी बुधवारी रात्री उशिरा सांगितलं की, ‘पश्चिम सेनेगल शहरातील तिवौनेमधील रुग्णालयात आगीमुळं 11 नवजात बालकांचा मृत्यू झालाय.’ यादरम्यान, पश्चिम आफ्रिकन देशातील आरोग्य व्यवस्थेबाबत सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सेनेगलमध्ये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta