Sunday , December 7 2025
Breaking News

देश/विदेश

गोवा : वेर्णा येथे भीषण आग; 30 कार आगीच्या भक्ष्यस्थानी

  वेर्णा : वेर्णा औद्योगिक वसाहतीत भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. वेर्णातील रेनो आणि स्कोडाच्या सर्व्हिस सेंटरला ही आग लागल्याने, जवळपास 30 कार जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत, आगीवर नियंत्रण मिळवले आहे. गवताला लागलेली आग पुढे पसरून बस जळल्याची घटना नुकतीच …

Read More »

छत्तीसगडमध्ये 20 नक्षलवादी ठार, एकावर तर 1 कोटीचा इनाम

    गडचिरोली : महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि नक्षल प्रभावित जिल्ह्यातून ही कीड हटवण्यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात आली आहे. छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफ कडून सुरू असलेला कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. 36 तास उलटूनही अजूनही ही चकमक सुरूच आहे. छत्तीसगडमधील दक्षिण बस्तर जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यात धुमश्चक्री …

Read More »

तुर्कीतील स्की रिसॉर्ट हॉटेलला भीषण आग! किमान ६६ जणांचा मृत्यू, ५१ जण जखमी

  तुर्कस्तानच्या एका स्की रिसॉर्टमधील एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीत किमात ६६ लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर ५० पेक्षा जास्त नागरिक यात जखमी झाले आहे. स्थानिक वेळेनुसार ३ च्या सुमारास ही आग लागली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आगीची दाहकता …

Read More »

कोलकत्याच्या ‘निर्भया’ला मिळाला न्याय; नराधमाला जन्मठेपेची शिक्षा

    नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या सियालदह न्यायालयाने आज (20 जानेवारी) कोलकाता आरजी कर बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने त्याला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. शिक्षेची घोषणा करताना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिर्बन दास म्हणाले की, हे दुर्मिळ प्रकरण नाही, त्यामुळे …

Read More »

महाकुंभ मेळ्यात सिलिंडर स्फोटामुळे १८ तंबूंमध्ये भीषण अग्नीतांडव

    प्रयागराज : प्रयागराजमधून मोठी बातमी समोर येत आहे. महाकुंभ मेळ्यात भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सिलिंडरचा स्फोट झाला आणि त्यानंतर ही आग लागल्याची बातमी सोमर येत आहेत. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरू आहे. …

Read More »

गोव्यात पॅराग्लायडिंग करताना दोघांचा मृत्यू…

    पणजी : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना महिला पर्यटक आणि पायलटचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 18 जानेवारी रोजी घडलेल्या घटनेनंतर गोवा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून पॅराग्लायडिंग कंपनीच्या मालकाला अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपघात झाल्याचे …

Read More »

भारताची स्टार नेमबाज मनू भाकरच्या आजी आणि मामाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू

  नवी दिल्ली : भारताची स्टार नेमबाज मनू भाकरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनू भाकरचे मामा आणि आजीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हरियाणातील महेंद्रगडच्या बायपास रोडवर हा अपघात घडला. मनू भाकरचे मामा आणि आजी हे दोघेही स्कूटीवरुन जात असताना अचानक एका गाडीने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण …

Read More »

गोमंतकीय कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी ठरला महाराष्ट्राचा उत्कृष्ट कवी.

    पणजी : समक्य दर्शन राज्यस्तरिय साहित्य समूह सोलापूर महाराष्ट्र राज्य आयोजित काव्यलेखन स्पर्धा. महाराष्ट्राचा उत्कृष्ट कवी/कवयित्री स्पर्धा क्र. १४ चा निकाल घोषितसमूह संस्थापक – देविदास गायकवाड व सुनिता तागवान.प्रशासिका – सुजाता उके. महाराष्ट्राचे उत्कृष्ट कवी ठरले आहेत मा.नवनाथ रामकृष्ण मुळवी, गोवा तर महाराष्ट्राची उत्कृष्ट कवयित्री ठरल्या आहेत मा.वैशाली …

Read More »

तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

  तिरुपती : प्रसिद्ध तिरुपती मंदिराच्या विष्णू निवासाजवळ चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत. या चेंगराचंगरीच्या घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तिरुपती मंदिराच्या रामानायुडू शाळेजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत मल्लिगा (५०) यांच्यासहित एकूण ६ जणांचा मृत्यू झाला …

Read More »

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; 5 फेब्रुवारीला मतदान, 8 तारखेला निकाल

  नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून या मतदानची मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार आहे आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत या संदर्भातली माहिती दिली आहे. देशाच्या अनेक राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अनेक रेकॉर्ड तयार …

Read More »