Sunday , July 26 2026
Breaking News

देश/विदेश

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू

  जम्मू-काश्मीर (पहलगाम) : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना घेरले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममध्ये काही पर्यटक फिरण्यासाठी आले होते. तेथील काही दहशतवादी सैन्याच्या वेशात येऊन त्यांना ‘तुम्ही मुस्लिम आहात का?’ असा …

Read More »

खासगी कंपनीचे विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू

  नवी दिल्ली : गुजरातच्या अमरेलीमध्ये विमान अपघाताची भीषण घटना घडली. मंगळवारी दुपारी अमरेलीतील गिरिया रोडवर एका खासगी कंपनीचे विमान अचानक कोसळले. विमान कोसळले तेव्हा त्यात वैमानिक होता. वैमानिकाचा या अपघातात मृत्यू झाला. एका खाजगी कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या पायलट प्रशिक्षण केंद्राचे हे विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला ज्यामुळे विमानाला आग …

Read More »

ख्रिश्चन समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन

  मानवतावादी कार्य आणि जगाला शांततेचा संदेश देणारे ख्रिश्चन समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. व्हॅटिकन यांनी व्हिडिओ पोस्ट करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पोप फ्रान्सिस यांनी सोमवारी सकाळी ७:३५ वाजता अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. पोप …

Read More »

सुरक्षा दलाची नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई; 8 नक्षलवादी ठार

  नवी दिल्ली : झारखंडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरक्षा दलांनी सुरु केली आहे. बोकारो जिल्ह्यातील लुगु टेकड्यांमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली आहे. सुरक्षा दलांनी ८ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. त्यांच्या संख्येत वाढ होऊ शकते. सीआरपीएफ आणि झारखंड पोलिसांकडून संयुक्तपणे ही कारवाई केली जात आहे. नक्षलवाद्यांवर कारवाई करण्यासाठी …

Read More »

पतीने केली 8 महिन्याच्या गर्भवती महिलेची हत्या…

  पालेम : प्रेमविवाह केलेले अनुषा आणि ज्ञानेश्वर हे दाम्पत्य तीन वर्षांपासून कुटुंबापासून दूर होते. अलीकडच्या काळात त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील पालेम येथील उडा कॉलनी येथे वैवाहिक वादातून 8 महिन्याची गर्भवती असलेल्या 27 वर्षीय पत्नीची पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत अनुषा ही 8 …

Read More »

तब्बल 1800 कोटींचे ड्रग्ज पकडले; गुजरातच्या समुद्रात कारवाई

  सुरत : गुजरातच्या समुद्रात कोस्ट गार्ड आणि गुजरात एटीएसच्या संयुक्त कारवाईत तब्बल 1800 कोटी रुपयांचा ड्रग्जसाठा असणारी बोट पकडली आहे. सुमारे 300 किलो एमडी ड्रग्ज या बोटीतून जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर समुद्रात करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,ही बोट रात्रीच्या अंधारात समुद्रातून पाकिस्तानच्या …

Read More »

पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक

  नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला बेल्जियम पोलिसांनी चोक्सी याला बेड्या ठोकल्या आहेत. भारत आता चोक्सी याच्या प्रत्यर्पणासाठी बेल्जियम सरकारकडे औपचारिक मागणी करणार असल्याचे सांगण्या येत आहे. मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी यांच्यावर पीएनबीमधून १३,५०० कोटी रुपयांचा घोटाळा …

Read More »

26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणले

  नवी दिल्ली : 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आले आहे. तहव्वुर राणा याला आणणारे स्पेशल विमान इंडियन एअरस्पेसमध्ये दाखल झाले आहे. दिल्लीत हे विमान लँड झाले आहे. पालम विमानतळावरून त्याला एनआयएच्या हेडक्वॉर्टरला नेलं जाणार आहे. पालम विमानतळावर सुरक्षा यंत्रणांचा अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चार इनोव्हा, …

Read More »

नाईट क्लबचे छत कोसळून 98 जणांचा मृत्यू; 160 जण जखमी

  डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये मंगळवारी (दि.8) रात्री मोठी दुर्घटना घडलीये. राजधानी सेंटो डोमिंगोमध्ये एका नाईट क्लबचा छत अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 98 जणांचा मृत्यू झाला तर 160 जण गंभीररित्या जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाईट क्लबचा छत कोसळला तेव्हा 500 ते 1000 लोक उपस्थित …

Read More »

भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधवचा भाजपात प्रवेश

  मुंबई : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या शहरांत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सर्वच प्रमुख पक्षांकडून केला जात आहे. आज (8 एप्रिल) रोजी भाजपात अन्य पक्षांचे अनेक नेते तसेच पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला. विशेष म्हणजे कधीकाळी क्रिकेटचे मैदान गाजववलेल्या भारताचा दिग्गज आणि मराठमोळा …

Read More »