रायपूर : छत्तीसगड राज्यातील रायपूर-बालोदाबाजार रस्त्यावर रविवारी रात्री उशिरा दोन ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. चौथिया छत्ती येथील एका कार्यक्रमात सहभागी होऊन परतत असताना सदर अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार रायपूर-बालोदाबाजार रस्त्यावरील सारागावजवळ मिनी ट्रक आणि ट्रेलर यांच्या समोरासमोर धडक झाली. या भीषण दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाले. मृत आणि जखमी हे चौथिया छत्ती येथील एका कार्यक्रमात सहभागी होऊन परतत होते. रायपूरच्या पोलिसांनी म्हटलं आहे की, “चटौड गावातील काही लोक छठ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बाणा बनारसी येथे गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते परतत होते. रायपूर-बालोदाबाजार रोडजवळ हा अपघात झाला.