कराची : भारताकडून करण्यात आलेल्या ऑपरेश सिंदूर अंतर्गत मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ जणांचा खात्मा करण्यात आला होता. यातील प्रत्येक व्यक्तीला पाकिस्तानी सरकार १ कोटी रूपये देणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून मसूद अझहरला ही आर्थिक मदत देण्यात येणार आहे. दरम्यान जागतिक दहशतवाद्याला पाकिस्तानकडून आर्थिक मदत देत दहशतवादाला पुन्हा खतपाणी घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर भारतीय हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झालेले लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय पुन्हा बांधण्याचे आश्वासनही पाकिस्तान सरकारने दिले आहे. त्यामुळे पाकिस्तानात पुन्हा एकदा अतिरेक्यांचे अड्डे तयार होणार का? असा सवाल केला जात आहे.