अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमधील गुन्हे शाखेच्या मानव तस्करीविरोधी पथकाने एका एड्सबाधित तरुणाला अटक केली आहे. आपल्याला हा दुर्धर रोग असल्याचे ठाऊक असतानाही या तरुणाने एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि 10 महिन्यांपूर्वी तो तिच्याबरोबर फरार झाला. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मागील 10 वर्षांपासून एड्सबाधित आहे. मात्र त्यानंतरही मागील 12 वर्षांपासून या तरुणाने 6 वेगवेगळ्या तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे शोषण केले.
..अन् मुलगी झाली बेपत्ता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असारवा येथे 22 मार्च 2024 रोजी आपल्या कुटुंबाबरोबर एका सामाजिक कार्यक्रमासाठी गेलेली ही अल्पवयीन मुलगी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अचानक गायब झाली. या मुलीच्या वडिलांनी शाहीनबाग पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तीन महिन्यापासून या मुलीचा शोध घेतल्यानंतरही तिचा शोध न लागल्याने एफ विभाग पोलिसांकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलं. यादरम्यान या अल्पवयीन मुलीने उच्च न्यायालयामध्ये हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली.
तपास करणाऱ्या पोलिसांना अखेर ही बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी मध्य प्रदेशमधील अनुपपूर जिल्ह्यातील कोतमा येथे सापडली. अल्पवयीन मुलीला घेऊन फार झालेल्या तरुणाला अहमदाबाद गुन्हे शाखेच्या मानव तस्करीविरोधी विभागाने अटक केली. आरोपीच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मागील 10 वर्षांपासून एड्सबाधित आहे. आरोपीने मागील 12 वर्षांमध्ये वेगवेगळ्या वेळात 6 हून अधिक तरुणांना प्रेमात अडकवून त्यांचे शोषण केले.