मिर्झापूर : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे कालका एक्सप्रेस ट्रेनने दिलेल्या धडकेत सहा महिलांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे स्टेशनवर रक्ताचा सडा पडला. चुनार रेल्वे स्टेशनवर सकाळी 9.30 वाजता हा अपघात झाला. चोपनहून एक …
Read More »बस आणि टिप्परची समोरासमोर भीषण धडक; 19 जणांचा मृत्यू
हैदराबाद : तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला आणि 20 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर तीन जण गंभीर जखमी झाले. चेवेल्ला मंडलमधील खानापूर गेटजवळ टीजीएसआरटीसी बस आणि टिप्पर ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवेल्लाजवळ राज्य परिवहन …
Read More »देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरची ट्रकला धडक, १८ भाविकांचा मृत्यू
फलोदी : राजस्थानच्या फलोदी जिल्ह्यातील माटोडा परिसरातील भारतमाला एक्सप्रेसवेवर रविवारी संध्याकाळी उशिरा एक भीषण अपघात झाला. जोधपूरमधील सुरसागर येथील रहिवासी असलेले अठरा जण एका टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये बिकानेरमधील कोलायत मंदिरातील देवदर्शनाहून परतत होते. हनुमान सागर चौकाजवळ, भरधाव वेगाने येणारा टेम्पो ट्रॅव्हलर अचानक उभ्या असलेल्या ट्रकला धडकला. या अपघातात अठरा जणांचा …
Read More »वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; १० जणांचा मृत्यू
श्रीकाकुलम : आंध्रप्रदेश राज्यातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात शनिवारी एकादशीच्या दिवशी मोठी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक गंभीर जखमी झाले आहे. आता प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कार्तिक महिन्याच्या निमित्ताने मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक जमा झाले होते. गर्दी इतकी वाढली …
Read More »महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिली तारीख
नवी दिल्ली : महाराष्ट्र–कर्नाटक सीमा वादावरील खटल्याची सुनावणी लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात विनंती करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने वरिष्ठ वकील श्री. वैद्यनाथन आणि शिवाजीराव जाधव यांनी ही विनंती न्यायालयात मांडली. यावर माननीय न्यायमूर्ती संजीवकुमार आणि न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांनी २१ जानेवारी २०२६ रोजी …
Read More »‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेते सतीश शाह यांचे निधन
मुंबई : मनोरंजनविश्वातून दु:खद बातमी आली आहे. टीव्ही आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय चेहरा अभिनेते सतीश शाह यांचे निधन झाले आहे. आज दुपारी २.३० वाजता हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते आणि किडनीच्या आजाराने त्रस्त होते. अनेक हिंदी सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. ‘हम …
Read More »प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला भीषण आग, २० प्रवासी जिवंत जळाले
कुर्नूल : आंध्र प्रदेशच्या कुरनूरमध्ये शुक्रवारी पहाटे भरधाव बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमध्ये २० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या बसमधून ४० प्रवासी प्रवास करत होते. बसला आग लागल्यानंतर काही प्रवाशांनी बसमधून बाहेर उड्या मारल्या त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. घटनास्थळावर पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने …
Read More »प्रसिद्ध विनोदी अभिनेते असरानी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन
मुंबई : प्रसिद्ध विनोदी अभिनेते असरानी यांचे आज निधन झाले. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. आज दुपारी ३ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. असरानी यांचे पूर्ण नाव गोवर्धन असरानी होते. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज २० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता त्यांचे निधन झाले. ते ८४ वर्षांचे …
Read More »गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
पणजी : दोन वेळा माजी मुख्यमंत्री राहिलेले कृषी मंत्री रवी नाईक यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. रवि नाईक यांनी ७९ व्या अखेरचा श्वास घेतला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्री रवी नाईक यांच्या निधनाची माहिती दिली. रवी नाईक यांच्या निधनाने गोव्यावर शोककळा पसरली असून कार्यकर्ते शोकसागरात बुडाले …
Read More »50 प्रवाशांनी भरलेल्या बसला भीषण आग; 10 ते 12 जण दगावल्याची माहिती
जैसलमेर : राजस्थानातील जैसलमेर येथे आज (14 ऑक्टोबर) एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेल्या बसला आग लागली आहे. यामध्ये 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. बस जैसलमेरहून जोधपूरला जात होती.यावेली बसला आग लागल्याची घटना घडली. या बसमध्ये एकूण 50 हून अधिक प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta