नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरण आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या खासदारांनी मंगळवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी प्रियंका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे अनेक खासदार उपस्थित होते. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत केंद्र सरकारवर टीका करत, …
Read More »संसद भवनाकडे मोर्चा; आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज
नवी दिल्ली : नीट (NEET) परीक्षेतील कथित घोटाळ्याचा निषेध करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी काक्रोच जनता पार्टी (CJP) च्या वतीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले आंदोलन रविवारी तीव्र झाले. संसद भवनाकडे “चलो संसद” मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अडवून लाठीचार्ज केला. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, …
Read More »गोव्याच्या भाजप आमदार तथा माजी मंत्री जेनिफर मोन्सेरात यांचे निधन
पणजी : गोव्यातील ताळगाव विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार तथा माजी मंत्री जेनिफर मोन्सेरात यांचे रविवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या आणि पणजीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. निधनाच्या वेळी त्या ५६ वर्षांच्या होत्या. जेनिफर मोन्सेरात या गोव्याच्या राजकारणातील प्रभावी महिला …
Read More »मतदार यादीत नाव नसल्याने नागरिकत्व संपत नाही : सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
नवी दिल्ली : मतदार यादीत एखाद्या व्यक्तीचे नाव नसल्याने किंवा नाव वगळण्यात आल्याने तिचे भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात येत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. नागरिकत्व निश्चित करण्यासाठी कायद्यानुसार स्वतंत्र प्रक्रिया असून ती निवडणूक आयोगाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पश्चिम बंगालमधील विशेष मतदार यादी …
Read More »व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली; १५ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
व्हिएतनाम : पर्यटनासाठी गेलेल्या भारतीय पर्यटकांवर मोठे संकट ओढवले आहे. व्हिएतनाममधील फु क्वोक (Phu Quoc) बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट समुद्रात उलटल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी असून काही प्रवाशांचा शोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने या दुर्घटनेबाबत …
Read More »मुंबई-बंगळुरू प्रवास होणार अधिक वेगवान; देशातील दुसरी ‘वंदे भारत स्लीपर’ अंतिम चाचणी टप्प्यात
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते केएसआर बंगळुरू रेल्वे स्थानकादरम्यान धावणारी देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन अंतिम चाचणी टप्प्यात दाखल झाली आहे. सर्व सुरक्षा चाचण्या आणि आवश्यक मंजुरी पूर्ण झाल्यानंतर ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) यांनी चेन्नईतील इंटिग्रल …
Read More »अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : ३८ दोषींची फाशी कायम; गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय
अहमदाबाद : २००८ मधील अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात गुजरात उच्च न्यायालयाने मंगळवारी मोठा निर्णय देत ३८ दोषींना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. तसेच ११ दोषींची जन्मठेपेची शिक्षाही कायम ठेवण्यात आली. विशेष न्यायालयाच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. २६ जुलै २००८ रोजी अहमदाबाद शहरात अवघ्या ७० मिनिटांत एकापाठोपाठ …
Read More »अयोध्या श्रीराम मंदिर देणगी अपहार प्रकरण : अटक आरोपींच्या घरांवर पोलिसांचे छापे
अयोध्या (उत्तर प्रदेश) : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी अपहारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आठही आरोपींच्या निवासस्थानांवर रविवारी पोलिसांनी एकाचवेळी छापेमारी केली. सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. स्थानिक दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या विशेष पथकांनी लव कुश मिश्रा, अविनाश शुक्ला, रामाशंकर यादव (टिन्नू यादव) यांच्यासह सर्व आरोपींच्या घरांची झडती …
Read More »पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा; महाराष्ट्राला अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल किंवा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी झालेल्या भेटीनंतर या चर्चांना अधिक वेग आला आहे. पंतप्रधान परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर आणि जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त …
Read More »राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणी सरचिटणीसांचा राजीनामा, 8 जणांना ठोकल्या बेड्या
नवी दिल्ली : आयोध्येतील राम मंदिरासाठी आलेल्या देणग्यांमध्ये चोरी केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी 8 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने एसआयटी दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारकडे प्राथमिक अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. रामाशंकर उर्फ टिन्नू यादव, अनुकल्प मिश्रा, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta