केरळ : सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या केरळमधील अखिल (Akhil NRD) आणि मेघा या दाम्पत्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असलेल्या या ‘क्यूट कपल’ने रील्स आणि व्ह्लॉग्सच्या माध्यमातून मोठी लोकप्रियता मिळवली होती. मात्र, त्यांच्या वैवाहिक जीवनाबाबत आता एक धक्कादायक दावा समोर आला आहे. अखिलने सोशल …
Read More »टँकरची ऑटो रिक्षाला धडक; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
शेतीचे काम आटोपून घरी परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला; ७ हून अधिक जण जखमी तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील जहीराबादजवळ चिरागपल्ली-सत्वार राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ऑटोचालकासह सहा जणांचा मृत्यू झाला. शेतीचे काम आटोपून ऑटो रिक्षातून आपल्या गावाकडे परतणाऱ्या मजुरांच्या ऑटोला भरधाव टँकरने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की ऑटो …
Read More »लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर; पेपरफुटीप्रकरणी कडक शिक्षेची तरतूद
नवी दिल्ली : नीटसह विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मांडलेले परीक्षा सुधारणा विधेयक बुधवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. दीर्घ चर्चेनंतर आवाजी मतदानाने या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. विधेयकावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी पोलिस कारवाईसंदर्भात …
Read More »मुख्यमंत्री विजय यांना मद्रास उच्च न्यायालयाचा झटका; करुर चेंगराचेंगरीतील मृतांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरीचा निर्णय रद्द
चेन्नई : तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या सरकारला मद्रास उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. करुर येथील रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या ४१ जणांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय न्यायालयाने रद्द केला आहे. न्यायमूर्ती सी. व्ही. कार्तिकेयन आणि आर. शक्तीवेल यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना म्हटले की, …
Read More »धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा, ‘कॉकरोच’ला सरकार घाबरलं
नवी दिल्ली : देशभरात प्रचंड खळबळ माजवणाऱ्या नीट (NEET) परीक्षेतील अनियमितता आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (X) द्वारे अधिकृतपणे कळवले की, त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवला आहे. आंदोलनाची तीव्रता आणि राजीनाम्याची …
Read More »‘पंढरीची वारी’ विषयावर राज्यस्तरीय काव्यलेखन उपक्रमाचे आयोजन
फोंडा (गोवा) : एनटीसी एड्युकॅअर ‘नवचैतन्य’ फोंडा-गोवा यांच्या वतीने राज्यस्तरीय काव्यलेखन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा दहावा उपक्रम असून यंदाचा विषय ‘पंढरीची वारी’ असा निश्चित करण्यात आला आहे. हा उपक्रम २० जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत आयोजित करण्यात …
Read More »पेपरफुटीविरोधात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, १० कोटी दंडाच्या नव्या विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : देशभरात गाजलेल्या विविध पेपरफुटी प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेपरफुटीविरोधी सुधारित विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. हे विधेयक लवकरच संसदेत मंजुरीसाठी मांडले जाणार आहे. सुधारित तरतुदींनुसार, सार्वजनिक परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटविणे किंवा अशा गुन्ह्यात सहभागी …
Read More »26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय
नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेतले. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. मध्यरात्री झालेल्या …
Read More »पेपरफुटीच्या मुद्द्यावर मोदी सरकारची कोंडी; संसदेपासून पंतप्रधान निवासापर्यंत विरोधकांचा हल्लाबोल
नवी दिल्ली : पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस लाठीमार आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवरील राजकीय दबाव अधिकच तीव्र होताना दिसत आहे. संसदेत सातत्याने गदारोळ, चर्चेची विरोधकांची मागणी आणि त्यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या दिशेने काढलेले आंदोलन यामुळे राजधानी दिल्लीतील राजकारण चांगलेच तापले. संसदेत पेपरफुटी …
Read More »जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा कहर; २३ जणांचा मृत्यू
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून, वाहनेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत. पूंछ जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार महिलांसह सात जणांचा मृत्यू झाला. तसेच जम्मू-किश्तवाड राष्ट्रीय महामार्गावर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta