नल्लागोंडा (तेलंगणा) : तेलंगणातील नल्लागोंडा शहरात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह बंद घरात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीनंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. प्राथमिक तपासात कौटुंबिक कारणांमुळे सामूहिक आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलीस विविध अंगांनी तपास …
Read More »पंढरपूरजवळ भीषण दुर्घटना; भाविकांचा टेम्पो विहिरीत कोसळून १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-म्हसवड मार्गावर रविवारी सकाळी हृदयद्रावक दुर्घटना घडली. सिद्धनाथांच्या दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांचा टेम्पो माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळील विहिरीत कोसळल्याने १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविकांचा समूह सिद्धनाथ …
Read More »दूधसागर नदीत चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; तिघे सख्खे भाऊ
पणजी/कुळे : सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांच्या सहलीचा शेवट हृदयद्रावक दुर्घटनेत झाला. गोव्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दूधसागर परिसरातील नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या चार विद्यार्थ्यांचा शनिवारी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावांचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वास्को येथील पाच मित्र …
Read More »हवाई दलाचे विमान कोसळले, ५ जवानांचा मृत्यू
नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेचे (IAF) ‘AN-32’ हे मालवाहू विमान आसाममधील जोरहाट एअरबेसवर लँडिंग करताना दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्दैवी घटनेत भारतीय हवाई दलाच्या ५ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. भारतीय हवाई दलाकडून ५ जणांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. सहवैमानिक बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. लँडिंगदरम्यान विमानाचे नियंत्रण सुटल्याने हा …
Read More »भरधाव स्कॉर्पिओ झाडाला धडकली; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, ४ जण गंभीर
रांची : झारखंडमध्ये झालेल्या भीषण रस्ता अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. लोहरदगा जिल्ह्यातील एका कुटुंबाची स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगाने जात असताना नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने हा भीषण अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाम मुस्तफा (वय ५८) हे …
Read More »पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाक लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
मुझफ्फराबाद : पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादजवळ पाकिस्तान लष्कराच्या एव्हिएशन विंगचे Mi-17 हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात वैमानिकासह हेलिकॉप्टरमधील सर्व 20 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर लष्कर व स्थानिक प्रशासनाच्या बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. प्राथमिक माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर उड्डाण घेत असताना …
Read More »स्टील प्लांटमध्ये भीषण दुर्घटना; उकळते स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा मृत्यू, 6 जण गंभीर
विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विझाग स्टील प्लांट येथे सोमवारी सायंकाळी भीषण औद्योगिक दुर्घटना घडली. स्टील मेल्टिंग शॉप (SMS-2) विभागात क्रेनद्वारे वाहतूक करण्यात येत असलेल्या उकळत्या स्टीलच्या लॅडलमध्ये (मोठ्या भांड्यात) अचानक बिघाड होऊन वितळलेले स्टील कामगारांवर कोसळल्याने 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 6 कामगार गंभीररीत्या भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात …
Read More »तर सत्ताधाऱ्यांना किंमत मोजावी लागेल; गॅस दरवाढीवरून शरद पवारांचा सरकारला इशारा
बारामती : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आता गॅस सिलेंडरही 29 रुपयांनी महागल्याने महागाईचा आणखी एक फटका जनतेला बसला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका करत सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला …
Read More »दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंटला भीषण आग; 21 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील मालवीय नगर परिसरात असलेल्या एका हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागून किमान 21 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, …
Read More »रशियावर भीषण हल्ला! प्रचंड नुकसान, एका भारतीयासह तिघांचा मृत्यू
गेल्या 4 पेक्षा जास्त वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले होत आहेत. रशियाची राजधानी मॉस्कोवर रविवारी युक्रेनकडून भीषण हल्ला करण्यात आला आहे. या ड्रोन हल्ल्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे, तर अन्य तीन भारतीय कर्मचारी जखमी झाले आहेत. भारतीय दुतावासाने याबाबत माहिती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta